Join us  

Rohit Sharma Birthday, Wife Ritika: Mumbai Indiansचा कर्णधार रोहितच्या वाढदिवशी पत्नी रितिकाचं ट्वीट; खास अंदाजात दिल्या नवरोबाला शुभेच्छा

मुंबईचा आज ‘टेबल टॉपर्स’ राजस्थानशी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 1:25 PM

Open in App

Rohit Sharma Birthday, Wife Ritika: भारतात सध्या IPL 2022 चा हंगाम सुरू आहे. या हंगामात Mumbai Indians च्या संघाला अद्याप आठ सामन्यात एकही सामना जिंकता आलेला नाही. तसेच, कर्णधार रोहित शर्मालादेखील आतापर्यंत आपल्या फलंदाजीची कमाल दाखवणं जमलेलं नाही. त्यामुळे गेल्या तीन-चार आठवड्यात रोहित आणि त्याच्या चाहत्यांना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळालेले नाहीत. पण याच दरम्यान, आज (३० एप्रिल) रोहितचा वाढदिवस असल्याने त्याची पत्नी रितिका हिने त्याच्यासाठी एक विशेष ट्वीट करत शुभेच्छा दिल्या.

रोहितला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाल्यापासून भारतीय संघाला एकदाही पराभवाचे तोंड पाहावे लागले नव्हते, पण मुंबई इंडियन्सला मात्र यंदाच्या हंगामात अद्याप एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे रोहित गेले काही दिवस खूप निराश आहे. अशातच त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पत्नी रितिका पाच फोटो पोस्ट केले. या फोटोंसह तिने कॅप्शन लिहिले की, हॅप्पी बर्थडे रो.. सॅमी (रोहितची मुलगी) आणि मी, आम्हा दोघींचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आमची कायम साथ दिल्याबद्दल आभार. हाकुना मटाटा (तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होवोत).

दरम्यान, २४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचे मेंटॉर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस होता. त्यादिवशी मुंबईचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होता. आधीचे सात सामने गमावलेल्या मुंबईच्या संघाकडून सचिनच्या वाढदिवशी तरी चाहत्यांना विजयाची भेट मिळेल अशी आशा होती, पण तसं घडल्याचं दिसलं नाही. लखनौच्या संघाने मुंबईचा ३६ धावांनी पराभव केला. आता आज तरी कर्णधार रोहितच्या वाढदिवशी मुंबईचा संघ चाहत्यांना विजयाचे गिफ्ट देणार का? हे पाहाणं औत्सुक्याचे असणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकर
Open in App