भारतीय क्रिकेट संघाला एका वर्षांत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खास सन्मान करण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहित शर्माचे नाव देण्यात आले आहे. या स्टँडच्या उद्घाटन प्रसंगी रोहित शर्मा आपल्या कुटुंबियांसह उपस्थितीत होता. रोहितच्या आई-वडिलांच्या हस्तेच या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. या खास प्रसंगी केलेल्या भाषणात रोहित शर्मांन आपल्या यशात आई वडिलांसह पत्नी रितिका, भाऊ विशाल अन् वहिनींचे योगदान असल्याचा उल्लेखही केला. या भाषणाशिवाय रोहित शर्माचा आणखी व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यात तो आपल्या भावावर भडकल्याचे दिसते. जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं? रोहितच्या कारवर कुणामुळे पडला स्क्रॅच?
जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमानंतर रोहित शर्मा आपल्या कारची प्रतिक्षा करताना उभे असल्याचे दिसते. काळ्या रंगाची कार आल्यावर रोहितला कारच्या मागच्या बाजूला स्क्रॅच दिसतो. मग त्याने भावाला हे काय आहे? असा प्रश्न केला? यावर भावाने रिव्हर्स घेताना झालं असे उत्तर दिले. यावर रोहित पुन्हा त्याला तुझ्याकडून झालं हे... असे म्हणत त्याच्यावर संतापल्याचे पाहायला मिळते.
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
मनातील भावना शब्दांत सांगण कठीण
वानखेडेच्या स्टेडियमवरील आपल्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन झाल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या नावाचे स्टँड या स्टेडियममध्ये पाहायला मिळले. दिग्गजांच्या नावासह या स्टेडियमवर आपल्या नावाचे स्टँड तयार झाल्यामुळे आनंद वाटतो. हे सगळं माझ्यासाठी स्वप्नवत असून मनातील भावना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे, असे म्हणत त्याने मुंबई क्रिकेट असोसिशनचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा हा महेंद्रसिंह धोनी पाठोपाठ भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारतीय संघाने जेतेपद पटकावल्याचे पाहायला मिळाले.