भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. सारे काही ठीक सुरु आहे, फक्त एक गोष्ट सोडून. ती म्हणजे रोहित शर्मा नाणेफेक गेले कित्येक सामने हरत आहे. कालही न्यूझीलंडविरोधात नाणेफेक हरल्यानंतर रोहित शर्मा काहीसा त्रस्त झालेला दिसला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉस जिंकल्यानंतर मुलाखत देत असताना कॅमेरामागे एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, जी प्रेक्षकांच्या कॅमेरात कैद झाली आणि आता व्हायरलही झाली आहे.
वरुण चक्रवर्ती नाही, तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा खरा दावेदार; झाकोळला गेला की अन्याय झाला?
सलग तेराव्यांदा टॉस हरल्याने रोहित शर्माला कॉमेंटेटरने दुरूनच विचारले. यावर रोहित शर्माने त्याला हातवारे करत तू निघ इथून म्हणत इशारा केला. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांना रोहित शर्मा चिडल्याचे वाटत असेल. परंतू व्हिडीओ पाहून तुम्हालाही खरे काय ते समजणार आहे.
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडिअमवर खेळविण्यात आलेल्या मॅचवेळी टॉस झाला. यावेळी न्यूझीलंडचा कप्तान मिशेल सँटनरने टॉस जिंकला व पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने तेराव्यांदा टॉस हरला होता. तर रोहितच्या नेतृत्वात ही १० वी वेळ होती. टॉस जिंकल्यानंतर ब्रॉडकास्टर इयान बिशपसोबत सँटनर बोलत होता. यावेळी रोहित कॅमेराच्या कक्षेच्या बाहेर गेला. यावेळी काही अंतरावर माजी विकेटकिपर दिनेश कार्तिक उभा होता. त्याने सलग टॉस हरत असल्यावरून रोहितला आवाज देत छेडले. यावर रोहितने त्याला हाताने तू निघ इथून असे म्हणत इशारा केला.
हा सर्व थट्टा मस्करीचा भाग होता. कार्तिकसोबत आणखी एक जण उभा होता. ते दोघे रोहितची मस्करी करत होते. यावर रोहितने ही रिअॅक्शन दिली होती.
भारताने शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकला होता. २०१७ मध्ये, अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. आता येत्या ४ मार्चला ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत. यानंतरच अंतिम सामन्यात एन्ट्री करता येणार आहे.