Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्मानं दिल्या विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:13 IST

Open in App

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकांनी तर मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपवण्यात यावे अशा मागण्या केल्या होत्या. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हा सर्व चर्चा खोडून काढल्या. रोहित व विराट यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे शास्त्रींनी स्पष्ट केले.

तरीही या दोघांमध्ये कुठेतरी वाद आहे, असा अंदाज अजूनही बांधला जात आहे. त्यामुळेच कोहलीच्या वाढदिवशी रोहितनं दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे. रोहितनं अवघ्या एका ओळीत विराटला शुभेच्छा दिल्या. त्यावरून सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया आल्या.  पाहा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहली