Join us

बायकोच्या वाढदिवशी रोहित शर्मा झाला भावूक

बायकोच्या वाढदिवशी आपण तिला भेटू शकलो नाही, याचे दु:ख रोहितला वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:58 IST

Open in App

मुंबई : रोहित शर्मा एक धडाकेबाज फलंदाज आणि शांत कर्णधार म्हणून प्रसिद्ध आहे. पण हाच रोहित भावूक होऊ शकतो, यावर तुमाचा विश्वास बसणार नाही. पण बायकोच्या वाढदिवशी मात्र रोहित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेत भारतात परतणार होता. पण आतापर्यंत तो भारतामध्ये आलेला नाही. बायकोच्या वाढदिवशी आपण तिला भेटू शकलो नाही, याचे दु:ख रोहितला वाटत आहे.

रोहितने ट्विटरवर आपली भावना व्यक्त केली आहे. रोहित म्हणाला की, " मला ही खंत आहे की माझ्या बायकोच्या वाढदिवसाला मी तिच्याबरोबर नाही.  गेल्यावर्षी आम्ही तिचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा केला होता. या वाढदिवसाचा फोटो मी शेअर करत आहे. " 

 

पर्थवरील पराभवानंतर त्याच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पत्नी रितिका साजदेह गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे आणि त्यासाठी रोहित ऑस्ट्रेलिया दौरा सोडून भारतात परतणार आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी रोहितला पत्नीसोबत राहायचे आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने याबाबत अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रोहितचे भारतात परतणे पक्के आहे आणि तसे झाल्यास कोहलीकडे फलंदाजीचा एक पर्याय कमी होईल.

टॅग्स :रोहित शर्मा