Join us

मी तेच केले जे मला करायला पाहिजे; रोहित शर्मानं 'माइंड सेट'वरही दिला भर

बीसीसीआयने रोहितचा एक खास व्हिडिओ शेअरे केलाय. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:42 IST

Open in App

रोहित शर्मानं कटकच्या मैदानात ३२ वे वनडे शतक झळकावत संघाच्या  विजयात मोलाचा वाटा उचलला. सातत्याने पदरी येणाऱ्या अपयशानंतर फ्लॉप शोचा टॅग लागलेल्या रोहित शर्मानं पुन्हा एकदा हिटमॅनचा अवतार दाखवून दिला. धावांसाठीचा संघर्ष संपवत रोहित शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९० चेंडूत ११९ धावांची दमदार खेळी  केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. जवळपास १६ महिन्यानंतर त्याच्या भात्यातून वनडेत शतक आले. या खेळीनंतर रोहित शर्मा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने रोहितचा एक खास व्हिडिओ शेअरे केलाय. जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.   

रोहित शर्मा झाला भावूक, पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं शतकाचं मोल 

बीसीसीआयने रोहित शर्माचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात बोलण्याआधी तो थोडा वेळ एकदम शांत उभा असल्याचे दिसते.  क्लास खेळीनंतर पाणावलेल्या डोळ्यातून त्याच्या मनात दाटून आलेल्या भावना शतकी खेळी त्याच्यासाठी किती खास होती तेच सांगून जातात. 

दमदार शतकी खेळीनंतर काय म्हणाला रोहित?

शतकी खेळीनंतर रोहित म्हणाला की, जो खेळाडू वर्षांनुवर्षे क्रिकेट खळतो, ज्याने धावा केल्यात त्याला काहीतरी महत्त्व असते. मी खूप काळापासून खेळतोय. मला माहितीय मला काय करायचं आहे. आज मी तेच केले जे मला करायला पाहिजे होते. माझ्या पद्धतीने खेळायचं एवढेच डोक्यात होते. एक दोन इनिंगमुळे माझा माइंड सेट बदलू शकत नाही. हा दिवसही नेहमी प्रमाणेच होता. नेहमी चांगली खेळी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतो. त्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्नही करतो. कधी चांगली खेळी होते कधी नाही. पण डोक्यात एक गोष्ट एकदम स्पष्ट असते ती म्हणजे माझा दृष्टिकोन. याशिवाय कोणतीही गोष्ट मॅटर करत नाही, अशा आशयाच्या शब्दांत रोहित शर्मानं नेहमीच अशी कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, 

अन् निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांची बोलती बंद करणारी इनिंग

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियावर व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात तो अपयशी ठरला. स्वत: कॅप्टन असताना अखेरच्या कसोटी सामन्यात त्याने बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. हे सर्व घडत असताना रोहित शर्माला फ्लॉप मॅनचा टॅग लागला. अनेकजणांनी तर त्याला निवृत्तीचा सल्लाही दिला. पण आता हिटमॅनची तळपत्या बॅटसह सर्वांची बोलती बंद केलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्माच्या भात्यातून आलेल्या धावा टीम इंडियासाठी  शुभ संकेतच आहेत.  

टॅग्स :रोहित शर्माभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआय