Join us

फक्त एकाच खेळीत रोहित शर्माने मोडीत काढले सर्व विक्रम...

आता तर रोहितने फक्त एका खेळीच्या जोरावरच सर्वच विक्रम मोडित काढल्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 13:04 IST

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा फलंदाज रोहित शर्मा हा भन्नाट फॉर्मात आले. रोहित एकदा स्थिरस्थावर झाली की त्याची फलंदाी ही डोळ्यांचे पारणे फेडणारी असते, असे म्हटले जाते. आता तर रोहितने फक्त एका खेळीच्या जोरावरच सर्वच विक्रम मोडित काढल्याची चर्चा आहे.

Related image

भारतीय संघ सध्या इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठी दाखल झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ काल इंदूरमध्ये दाखल झाला आहे. गेल्या कसोटी मालिकेत रोहितने दमदार खेळी साकारल्या होत्या. पण ती एक खेळी कोणती, याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना इंदूर येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. हे मैदान रोहित शर्मासाठी खास समजले जाते. त्यामुळेच रोहित शर्मा आणि त्याची ती भन्नाट खेळी सर्वांना आठवते आहे.

रोहितने इडन गार्डन्सवर २०१४ साली आजच्याच दिवशी झालेल्या एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. त्याचबरोबर आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके रोहितच्याच नावावर आहे रोहितने श्रीलंकेविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक द्विशतक झळकावले आहे. पण रोहितच्या २६४ धावांचा  विश्वविक्रम कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत मोडता आलेला नाही.

टॅग्स :रोहित शर्मा