सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

पाकिस्तान विरुद्ध एक धाव करताच रोहितच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:53 IST2025-02-23T20:50:19+5:302025-02-23T20:53:40+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma becomes fastest ODI opener to 9000 runs, breaks Sachin Tendulkar’s record in IND vs PAK Champions Trophy match | सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरपेक्षा 'फास्टर' निघाला रोहित शर्मा; ९००० धावांसह सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात २० धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या खेळीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. पाक विरुद्धच्या हायहोल्टेज लढतीत रोहितनं  एक धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे पडला. आता सलामीवीराच्या रुपात सर्वात जलद ९००० धावा करण्याचा विक्रम  रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 
  
रोहित शर्मानं ओपिनिंग करताना पार केला ९ हजार धावांचा आकडा

रोहित शर्मानं वनडेत आतापर्यंत २६२ डावात ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारताच्या डावाची सुरुवात करताना त्याने १८१ डावात ९ हजार धावांचा पल्ला  गाठला आहे. रोहितशिवाय वनडेत सलामीला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये बाबतीत  सचिन-गांगुली हे दोनच फलंदाज हिटमॅनच्या पुढे आहेत

या दिग्गजांच्या क्लबमध्ये मारली एन्ट्री

 ३७ वर्षीय रोहित शर्मा वनडेत सलामीवीराच्या रुपात ९००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेट जगतातील सहावा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर (१५३१०), सनथ जयसूर्या (१२७४०), ख्रिस गेल (१०१७९), एडम गिलख्रिस्ट (९२००) आणि सौरव गांगुली (९१४६) यांच्या क्लबमध्ये त्याने एन्ट्री मारली आहे.

ओपनरच्या रुपात सर्वात जलदगतीने ९ हजार धावा करणारे फलंदाज

  • रोहित शर्मा (१८१ डाव)
  • सचिन तेंडुलकर (१९७ डाव)
  • सौरव गांगुली (२३१ डाव)
  • ख्रिस गेल (२४६ डाव)
  • एडम गिलख्रिस्ट (२५३ डाव)
  • सनथ जयसूर्या (२६८ डाव)
     

Web Title: Rohit Sharma becomes fastest ODI opener to 9000 runs, breaks Sachin Tendulkar’s record in IND vs PAK Champions Trophy match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.