Rohit Sharma Captain: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याच्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, रोहितच्या फिटनेसवर मधल्या काळात प्रचंड टीका झाल्यानंतर, त्याने १० किलो वजन कमी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेत त्याला सहज संधी मिळाली. पण टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्यामुळे या दिग्गज खेळाडूची कारकीर्द कदाचित शेवटच्या टप्प्यात असेल असा अंदाज लावला जात आहे. तशातच आता रोहित शर्माला एका खास संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे.
रोहित शर्मा बनला संघाचा कर्णधार
झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझा याने त्याला त्याच्या पसंतीच्या एका संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. सिकंदर रझा याला त्याच्या पसंतीच्या सर्वोत्तम टी२० संघाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने या संघात ११ दिग्गज खेळाडूंचा समावेश केला. त्यात त्याने रोहित शर्माला सर्वप्रथम स्थान दिले आणि त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्याने विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यासारख्या दिग्गज खेळाडूंना मात्र या संघात समाविष्ट केलेले नाही.
'या' दिग्गज खेळाडूंचा समावेश
सिकंदर रझाच्या संघात रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून ख्रिस गेलची निवड करण्यात आली आहे. त्याने यष्टीरक्षक म्हणून निकोलस पूरनची निवड केली आहे. एबी डिव्हिलियर्स, हेनरिक क्लासेन आणि किरॉन पोलार्ड यांचाही संघात समावेश आहे. सिकंदर रझाने यांनी शाहिन शाह आफ्रिदी आणि रवींद्र जाडेजा यांचाही संघात समावेश केला आहे. तसेच राशिद खान, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क आणि शाहीन आफ्रिदी यांचाही संघात समावेश आहे.
सिकंदर रझाचा सर्वकालीन सर्वोत्तम टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस गेल, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एबी डिव्हिलियर्स, हेनरिक क्लासेन, किरॉन पोलार्ड, रवींद्र जाडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, शाहीन शाह आफ्रिदी, मिचेल स्टार्क