रोहित शर्मा भडकला आणि जडेजाच्या अंगावर धावला

जडेजाच्या एका कृत्यावर रोहित चांगलाच भडकला होता. त्यानंतर रोहित जडेजाच्या अंगावर धावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:38 IST2018-06-05T16:38:35+5:302018-06-05T16:38:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma Angry and ran over ravindra Jadeja | रोहित शर्मा भडकला आणि जडेजाच्या अंगावर धावला

रोहित शर्मा भडकला आणि जडेजाच्या अंगावर धावला

ठळक मुद्देरोहित थेट जडेजाच्या अंगावर धावून गेला आणि त्याला शांत केले.

नवी दिल्ली : ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची. भारतीय संघ या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताला कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. या कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा एका ठिकाणी फिरायला गेले होते. त्यावेळी जडेजाच्या एका कृत्यावर रोहित चांगलाच भडकला होता. त्यानंतर रोहित जडेजाच्या अंगावर धावला होता.

कसोटी मालिका संपल्यावर रोहित, त्याची पत्नी रितिका, अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिका आणि जडेजा, असे एका गाडीतून सफारीसाठी गेले होते. ही सफारी जोहान्सबर्गपासून 90 कि.मी.च्या अंतरावर होती. या सफारीमध्ये बिबटे मोठ्या प्रमाणात दिसतात, असे त्यांना सांगितले होते. हे सगळे एका गाडीतून जंगलामध्ये शिरले होते. जवळपास अर्ध जंगल त्यांनी मागे टाकले होते. त्यानंतर त्यांना एका ठिकाणी काही बिबटे दिसले.

बिबट्यांना पाहून जडेजा विचित्र आवाज काढायला लागला. तो आवाज ऐकून बिबटे त्यांच्या गाडीच्या दिशेने यायला सुरुवात झाली. त्यावेळी जडेजाला सोडून सर्वांनाच भिती वाटली होती. बिबटे येत असल्याचे पाहूनही जडेजाने आवाज काढणे बंद केले नाही. तेव्हा रोहित आणि रहाणेने त्याला समजावले, तरीही जडेजा काही शांत बसत नव्हता. त्यावेळी रोहित थेट जडेजाच्या अंगावर धावून गेला आणि त्याला शांत केले. त्यानंतर आपण कधीही जडेजाबरोबर फिरायला जाणार नसल्याचे रोहितने सांगितले.

Web Title: Rohit Sharma Angry and ran over ravindra Jadeja