भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमाखदार विजय नोंदवत इतिहास रचला आहे. २०१३ नंतर टीम इंडियानं तिसऱ्यांदा या विक्रमी ट्रॉफीवर नाव कोरले. जड्डूनं विजय चौकार मारला अन् तमाम भारतीयांनी एकच जल्लोष केला. हे जेतेपद रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठीही खास ठरले. कारण या जोडीनं आपल्या कारकिर्दीतील ही चौथी आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. दोघांनी दुबईच्या मैदानात स्टंप हातात घेऊन चक्क दांडियाचा खेळ खेळत विजयाचा आनंद साजरा केला. दोघांच्यातील हा खास सीन सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉसचा बॉस होता आले नाही, पण मॅचचा बॉस ठरत फायनल बाजीही मारलीभारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा वनडे वर्ल्ड कप २०२३ पासून सुरु असलेला टॉस गमावण्याचा सिलसिला मिनी वर्ल्ड कप स्पर्धेतही कायम राहिला. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात रोहितनं टॉस गमावला. पण त्यानंतर प्रतिस्पर्धी संघानं टार्गेट सेट करु देत किंवा टीम इंडियाला टार्गेट सेट करण्याची वेळ येऊ देत टीम इंडियाने सामना जिंकली. रोहित शर्मा टॉसचा बॉस ठरला नसला तरी मॅचचा बॉस मात्र टीम इंडिया आहे हे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्येही सिद्ध झाले अन् भारतीय संघानं तिसऱ्यांदा ही स्पर्धा गाजवली. रोहित शर्मा या सामन्यात ७६ धावांच्या खेळीसह मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
कोहली आला अन् दोन चेंडू खेळून माघारी परतला, पण...
विराट कोहलीला चेज मास्टर म्हणून ओळखले जाते. धावांचा पाठलाग करताना तो मोठी खेळी करण्यात माहिर आहे. अनेकदा त्याने ते करून दाखवलंय. यावेळीही त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण दोन बॉल खेळून तो अवघ्या एका धावेवर माघारी फिरला. सलामीच्या सामन्याप्रमाणे फायनल मॅचही त्याला मोठी खेळी करता आली नाही. पण भारतीय संघाला इथपर्यंत आणण्यात त्याचा वाटा हा मोलाचा राहिला. मग ती पाकिस्तान विरुद्धची हायहोल्टेज मॅचमधील दमदार शतकी खेळी असो की, सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने तोऱ्यात केलेली बॅटिंग असो. कोहली फायनलमध्ये चमकला नसला तरी संघाच्या विक्रमी विजायत या भाऊचा मोठा वाटा आहे.