ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा आंतरारष्ट्रीय मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. पण या एकाच प्रकारात ही जोडी किती काळ टिकणार? २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ते संघात राहतील का? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही खेळाडूंना दांडगा अनुभव असला तरी भारतीय संघात कायम राहण्यासाठी कामगिरीतील सातत्य दाखवण्याचं एक मोठं आव्हान या जोडीसमोर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी रोहित-विराट तयार?
रोहित शर्मा आणि विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसतील, अशी माहिती समोर येत आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ ६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या वर्षातील अखेरचा वनडे सामना खेळणार आहे. त्यानंतर थेट पुढच्या वर्षी ११ जानेवारीला भारत- न्यूझीलंड यांच्यात वनडे सामना खेळवण्यात येईल. मधल्या काळात जवळपास ५ आठवड्यांचे अंतर आहे. २४ डिसेंबर पासून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माला मुंबईच्या संघाकडून किमान ३ सामने खेळायला मिळतील. विराट कोहलीला देखील अशीच संधी उपलब्ध असेल, असा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे. याआधी दोघांनीही देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले आहे. करिअर वाचवण्यासाठी मनात नसणारी गोष्टही त्यांना करावी लागेल. त्यामुळेच ही जोडी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या माध्यमातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रीय होईल, असे दिसते.
रोहित-विराट २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? नकारात्मक चर्चेत शुबमन गिलचं सकारात्मक वक्तव्य
त्याआधी ही लढाई जिंकण्याचं असेल आव्हान
२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जेतेपद पटकावल्यावर रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं छोट्या फॉरमेटमधून निवृत्ती घेतली होती. इंग्लंड दौऱ्याआधी या दोघांनी पुन्हा एका पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघेही आता फक्त वनडेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय दिसतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका दोघांसाठी पहिली लढाई असेल. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलनंतर तब्बल ७ महिन्यांनी ते क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत.