आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील फायनल टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील काही खास क्षणांनीही लक्षवेधी ठरली. रोहित शर्मा हा संघाचा भाग नसला तरी या स्पर्धेच्या ब्रँड अँबेसिडरच्या रुपात तो चर्चेत राहिला. दरम्यान भारतीय संघाच्या विजय जल्लोष सुरु असताना रोहित शर्मा आणि रितिका यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रितिका अन् रोहितच्या व्हायरल व्हिडिओवर रंगली चर्चा
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह ही परफेक्ट कपल गोल सेट करणाऱ्या जोडीपैकी एक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोहित शर्मा जोडीची झलक दिसल्यावर दोघांच्यामध्ये कोणत्या गोष्टीवरुन चर्चा रंगली याबद्दल चाहते तर्कवितर्क लावत आहेत. रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव पाहून काहीजण तर त्यांच्यात वाद वैगेरे झाला की काय? असा प्रश्नही उपस्थितीत करत आहेत. पण जर हा व्हिडिओ नीट पाहिला तर यात दोघांच्यातील कमालीच्या केमिस्ट्रीचा खास नजराच दिसून येतो.
Video: Hardik Pandya विश्वचषक जिंकून भरमैदानात Mahieka Sharma सोबत थेट स्टेजवरच झोपला...
नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभा असल्याचे दिसते. तर रितिका सजदेह मैदानात लावण्यात आलेल्या बॅरेकेट्सच्या पलिकडे उभी आहे. मैदानात गोंगाट असल्यामुळे ती रोहित शर्माचा हात हातात घेत त्याला काहीतरी सांगताना दिसते. त्यावर रोहित शर्मा नाराजी व्यक्त करतो. पण रितिका विषय तिथेचं न थांबवता आपल्या परीने त्याला समजावत त्याला मनवताना दिसते. शेवटी तिच्या चेहऱ्यावरील हास्य ती जिंकल्याचे संकेत देऊन जातात. रोहित शर्मा हा रितिकाच्या मताशी सहमत नसताना रितिका ज्या पद्धतीने त्याला समजवते तेही अनेकांना भावले आहे. या गोष्टीमुळेच ही जोडी मनात घर करुन जाते, अशा काही प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
भारतीय संघाच यश रोहित शर्मासाठीही ठरलं खास, कारण...
अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये हिटमॅन रोहित शर्माचा वारसा जपत सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाला सलग दुसरे जेतेपद मिळवून दिले. न्यूझीलंडविरुद्धचा विजय रोहित शर्मासाठीही खास होता. कारण याच मैदानात २०२३ वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित शर्माच्या पदरी निराशा आली होती. या मैदानातील पराभवाची मालिका खंडीत करून सूर्याच्या नेतृत्वाखालील संघाने जेतेपद उंचावल्यावर रोहितच्या चेहऱ्यावरही आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसले.
Web Summary : Video of Rohit Sharma and Ritika at the T20 World Cup final goes viral. Despite Rohit's initial disagreement, Ritika persuades him, showcasing their strong chemistry. Suryakumar Yadav led India to victory, bringing joy to Rohit after the 2023 World Cup defeat.
Web Summary : टी20 विश्व कप फाइनल में रोहित शर्मा और रितिका का वीडियो वायरल। रोहित की असहमति के बावजूद, रितिका ने उन्हें मनाया, जिससे उनकी केमिस्ट्री दिखी। सूर्यकुमार यादव ने भारत को जीत दिलाई, जिससे रोहित खुश हुए, जिन्हें 2023 विश्व कप में निराशा मिली थी।