Rohit Sharma and Ritika have been blessed with a baby boy : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी शुक्रवारी १५ नोव्हेंबरला दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. २०१८ मध्ये जन्मलेली लेक समायरा हे या जोडीचं पहिलं अपत्य आहे. आता ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा झालीये. दोघांनी अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावरही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. रितिकानं बेबी बॉयला जन्म दिला याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. जोडप्याच्या बेबी बॉयसाठी सोशल मीडियावर ज्यूनिअर हिटमॅन हा ट्रेंड सेट झाला आहे. नेटकरी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसते.
एका बाजूला भारतीय संघ बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहचून सरावाला लागला आहे. पण या संघात रोहित दिसला नव्हता. दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळेच तो संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नव्हता. पण आता गुडन्यूज मिळाल्यावर तो पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार का? हा मुद्दा देखील चर्चेचा विषय ठरेल.
रोहित रितिका या जोडीची लव्ह स्टोरी एकदम खास आहे. रोहित शर्मा हा फिल्ड बाहेर रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळेही चर्चेत असतो. दुसरीकडे रोहित फिल्डवर असताना रितिका नेहमी त्याला चीयर करतानाही पाहायला मिळाले आहे. रोहितनं ज्या बोरिवलीच्या स्पोर्ट्स क्लबमधून क्रिकेटला सुरुवात केली त्या क्लबमध्येच अगदी गुडघ्यावर बसून रोहितनं रितिकाला प्रपोज केले होते. ६ वर्षे एकमेकांसोबत डेट केल्यावर २०१५ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. लग्नाच्या तीन वर्षानंतर म्हणजे २०१८ मध्ये रितिकाने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. या दोघांच्या पहिल्या मुलीचं नाव समायरा असं आहे. त्यानंतर आता बेबी बॉयच्या रुपात रोहित शर्माची फॅमिली पूर्ण झाल्याचे दिसते.