Join us  

T20 World Cup साठी रोहित शर्माचा एल्गार, म्हणाला... जिंकण्यासाठी सर्वस्व झोकून द्यायला तयार!

रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचं नेतृत्त्व करत आहे. असं असलं तरी त्याचं लक्ष येत्या महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपवर (T20 World Cup 2021) आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 3:11 PM

Open in App

रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचं नेतृत्त्व करत आहे. असं असलं तरी त्याचं लक्ष येत्या महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपवर (T20 World Cup 2021) आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकून भारताचा आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला असून त्यानं एक खास पोस्ट इन्स्ट्रामवर केली आहे. भारतीय युवा संघानं २००७ साली ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. रोहित शर्मा त्या संघाचा सदस्य होता. रोहितनं बुधवारी २००७ सालच्या विश्वविजयाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि ट्वेन्टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी जीवाचं रान करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. 

"२४ सप्टेंबर २००७ जोहान्सर्बग. हाच तो दिवस जेव्हा कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण झाली. एक युवा संघ इतिहास घडवले असा विचार कुणी केला होता? १४ वर्ष झाली या अनमोल घटनेला. आता आपण खूप पुढे आलो आहोत. त्यानंतरही अनेक ऐतिहासिक विजय प्राप्त केले. काही धक्के देखील मिळाले पण आजही हिंमत हरलेलो नाही. कारण आम्ही कधीही हार पत्करणारे नाही. आम्ही जीवाचं रान करू!! ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पुन्हा घडवायचा आहे आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. आम्ही येतोय. हा चषक आमचा आहे. चला आपण करुन दाखवूया", असं प्रेरणादायी कॅप्शन रोहित शर्मानं आपल्या पोस्टला दिलं आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१रोहित शर्माआयपीएल २०२१मुंबई इंडियन्स
Open in App