नवी दिल्ली: रोहन जेटली पुन्हा एकदा दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्यावर विजय मिळविला.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांचे पुत्र ३५ वर्षीय रोहन यांना १५७७ मते मिळाली तर आझाद यांनी ७७७ मते मिळविली. एकूण २४१३ जणांनी मतदान केले आणि विजयासाठी १२०७ मतांची गरज होती. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची मुलगी शिखा कुमार हिने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकेश कुमार बन्सल आणि सुधीर कुमार अग्रवाल यांना पराभूत केले. तिघांना अनुक्रमे १२४६, ५३६, ४९८ मते मिळाली.
अशोक कुमार (८९३) सचिवपदी निवडून आले तर हरीश सिंगला (१३२८) खजिनदार झाले. अमित ग्रोव्हर (११८९) संयुक्त सचिव असतील.