Join us  

सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग जोडी पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करणार; सलामीला उतरून प्रतिस्पर्ध्यांना धु धु धुणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ( India vs England, 1st Test) चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. इंग्लंडनं २२७ धावांनी हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 09, 2021 5:15 PM

Open in App

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ( India vs England, 1st Test) चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. इंग्लंडनं २२७ धावांनी हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या पराभवानं निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ( The Road Safety World Series) क्रिकेट स्पर्धेत सचिन खेळणार आहे. त्याच्यासह विरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन हे दिग्गजही क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत. चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

कोरोना व्हायरसमुळे केवळ चार सामने खेळवल्यानंतर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचा पहिला हंगाम स्थगित करण्यात आला होता. महान फलंदाज सुनील गावस्कर हे या सीरिजचे कमिशनर होते आमइ सचिन तेंडुलक सदिच्छादूत होता. देशातील रोड सेफ्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या सीरिजचं आयोजन केलं गेलं आहे. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि भारताच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. यंदा ही स्पर्धा २ ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पहिल्या मोसमाचे सामने खेळवण्यात आले होते, परंतु आता सर्व सामने छत्तीसगड येथीस शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील. टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण

टॅग्स :सचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागभारतीय क्रिकेट संघ