निम्मा संघ ५७ धावांवर परतलेला माघारी; रियान परागने ठोकले शतक, कुटल्या १६ चेंडूंत ८६ धावा 

संपूर्ण आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या रियान परागने ( Riyan Parag) आज देवधर ट्रॉफीत पूर्व विभागासाठी स्फोटक खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:22 PM2023-07-28T14:22:10+5:302023-07-28T14:22:30+5:30

whatsapp join usJoin us
Riyan Parag scored 131 runs from just 102 balls including 5 fours & 11 sixes when West Zone was 57/5 in Deodhar Trophy | निम्मा संघ ५७ धावांवर परतलेला माघारी; रियान परागने ठोकले शतक, कुटल्या १६ चेंडूंत ८६ धावा 

निम्मा संघ ५७ धावांवर परतलेला माघारी; रियान परागने ठोकले शतक, कुटल्या १६ चेंडूंत ८६ धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

संपूर्ण आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या रियान परागने ( Riyan Parag) आज देवधर ट्रॉफीत पूर्व विभागासाठी स्फोटक खेळी केली. उत्तर विभागाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून पूर्व विभागाची अवस्था ५ बाद ५७ अशी दयनीय केली होती. पण, रियान पराग आणि कुमार कुशग्र यांनी सहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आणि संघाला ८ बाद ३३७ धावांचा डोंगर उभा करून दिला.


पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिमन्यू ईश्वरन ( १०), विराट सिंग ( २) यांना हर्षित राणाने बाद केले. उत्कर्ष सिंग ( ११)ची विकेट संदीप शर्माने घेतली, तर शुभ्रांषू सेनापती ( १३) व कर्णधार सौरभ तिवारी ( १६) यांची विकेट मयांक यादवने घेतली आणि पूर्व विभागाची अवस्था ५ बाद ५७ अशी केली. त्यानंतर मात्र रियान व कुमार या जोडीने उत्तर विभागाच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी २३५ धावांची भागीदारी केली आणि लिस्ट ए क्रिकेटमधील ही भारतीय फलंदाजांनी सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील सर्वोत्तम भागीदारी ठरली.


रियानने १०२ चेंडूंत १३१ धावा केल्या. त्याने ५ चौकार व ११ षटकारांच्या मदतीने केवळ १६ चेंडूंत ८६ धावा चोपल्या. कुमारने ८७ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी केली. शाहबाद ( १६*), मुरा सिंग ( २५) यांनीही योगदान दिले. प्रत्युत्तरात उत्तर विभागाने ११.३ षटकांत १ बाद ६६ धावा केल्या आहेत.

Web Title: Riyan Parag scored 131 runs from just 102 balls including 5 fours & 11 sixes when West Zone was 57/5 in Deodhar Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.