Join us  

ऋतुराजचा पराक्रमी धडाका, स्वत:च्या नावे केला विक्रम

विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 5:46 AM

Open in App

अहमदाबाद : विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शुक्रवारी शतकी खेळी केली. ऋतुराजने १३१ चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांसह १०८ धावा केल्या. 

अंतिम सामन्यात १०८ धावांची खेळी करीत ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने रॉबिन उथप्पा आणि अंकित बावणे यांना मागे टाकले. ऋतुराजच्या नावावर या स्पर्धेत १२ शतके  झाली आहेत. उथप्पा आणि बावणे यांनी प्रत्येकी ११ शतके केली आहेत. ऋतुराजने या स्पर्धेच्या गेल्या १० पैकी आठ डावात शतक झळकावले आहे. ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शिवा सिंहला एका षटकात सात षटकार मारले. त्याने सात चेंडूत ४३ धावा केल्या. लिस्ट-ए च्या क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे.

या स्पर्धेतील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक आहे. याआधी त्याने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध २२० धावा केल्या. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत आसामविरुद्ध १६८ धावांची खेळी केली. या हंगामात ऋतुराजने पाच सामन्यांत २२०च्या सरासरीने ६६० धावा केल्या. 

महाराष्ट्र उपविजेताऋतुराज गायकवाडचा (१०८) शतकी धडका महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात मात्र कमी पडला. अनुभवी शेल्डन जॅक्सनच्या (नाबाद १३३) शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने विजय हजारे चषकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा ५ गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्र संघाने ५० षटकांत ९ बाद २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने ४६.३ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पूर्ण करत विजेतेपदावर नाव कोरले. 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडविजय हजारे करंडक
Open in App