Join us  

रोहितपेक्षा 'हा' प्लेयर ठरला असता बेस्ट कर्णधार; हिटमॅनला कॅप्टन करण्यावर दिग्गज क्रिकेटरनं खडा केला सवाल!

विराट कोहलीच्या जागी आता रोहित शर्माला (Rohit Sharma) T-20 संघाचा (T20 indian cricket team) नवा कर्णधार बनविण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 5:29 PM

Open in App

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक स्पर्धेत गटांतर्गत सामन्यांमध्येच पराभूत झाल्याने टोर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर, टीम इंडियामध्ये मोठे बदल बघायला मिळत आहेत. विराट कोहलीच्या जागी आता रोहित शर्माला (Rohit Sharma) T-20 संघाचा (T20 indian cricket team) नवा कर्णधार बनविण्यात आले आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमधील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआय विराट कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भविष्यासंदर्भातही लवकरच निर्णय घेऊ शकते. तसेच, 2023मध्ये होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकापूर्वी टी-20 आणि एकदिवसीय फॉर्मेटसाठी एकच कर्णधार असा, अशी बीसीसीआयची इच्छा असल्याचेही मानले जाते. अशा स्थितीत कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भवितव्याबाबतही आगामी काळात मोठा निर्णय होऊ शकतो.

रोहित शर्माला कर्णधार बनविण्यावर उपस्थित करण्यात आले प्रश्नचिन्ह -इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रीमी स्वानने (Graeme Swann) रोहित शर्माला भारतीय संघाचा नवा T-20 कर्णधार बनविण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रीमी स्वानच्या मते, रोहित शर्माला कर्णधारपद द्यायला नको होते. ग्रॅमी स्वान म्हणाला, रोहित शर्माचे वय लक्षात घेता, निवडकर्त्यांनी त्याच्या ऐवजी युवा फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघाचा कर्णधार करायला हवे होते. कालच रोहित शर्माला भारतीय संघाचा टी-20 कर्णधार बनविण्यात आले आहे.

ऋषभ पंत पुढील 10 वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळू शकत होता -'क्रिकेट डॉट कॉम'सोबत बोलताना ग्रीम स्वान म्हणाला, 'रोहित चांगला आहे, पण तो अधिक काळ भारतीय संघाचा कर्णधार म्हणून राहू शकत नाही. तर ऋषभ पंत पुढील 10 वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळू शकत होता. स्वान म्हणाला, 'ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आपल्या खेळाचा स्तरही उंचावला आहे. त्याच्यात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीचे मिश्रण दिसते. याशिवाय ऋषभ पंत विराटप्रमाणे उत्साही दिसतो, तसेच विकेटच्या मागे नेहमीच आनंदी आणि खेळाडूंशी बोलत असतो.

IPL मध्ये दाखवला दम -या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाल्यानंतर पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. ऋषभ पंतने या संधीचा चांगला उपयोग करून घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफपर्यंत नेले. पंत सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्थान मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. स्वान म्हणाला, 'भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी पंत हा सर्वोत्तम उमेदवार आहे. मी रोहित शर्माचे नाव घेत नाही, कारण वय त्याच्या आड येते.'

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयरिषभ पंत
Open in App