Join us  

रिषभ पंत कसोटी क्रिकेटही गाजवेल- राहुल द्रविड

द्रविड यांनी यावेळी भारतीय ' अ ' संघाने केलेल्या ब्रिटनच्या दौऱ्यातील पंतच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 4:02 PM

Open in App
ठळक मुद्देकसोटी क्रिकेटमध्ये पंतला चांगली कामगिरी करता येईल का, अशी शंका काही जणांच्या मनात आहे.

नवी दिल्ली : युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची आक्रमक फलंदाजी आपण आयपीएलमध्ये पाहिली आहे. आता तर पंतला भारताच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पंतला चांगली कामगिरी करता येईल का, अशी शंका काही जणांच्या मनात आहे. पण भारतीय ' अ ' संघाचे प्रशिक्षक यांच्या मनात मात्र याबद्दल कुठलीच शंका नाही. पंत हा ट्वेन्टी-20 प्रमाणे कसोटी क्रिकेटही गाजवेल, असे मत द्रविडने व्यक्त केले आहे.

पंतबद्दल द्रविड म्हणाले की, " पंत हा आक्रमक फलंदाज आहे. आपण आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी पाहिली आहे. पण पंत हा फक्त आक्रमण करत नाही, तर परिस्थितीनुसार तो त्याचा खेळ बदलत असतो. त्यामुळे पंत हा कसोटी क्रिकेटमध्येही चांगली करेल. " 

द्रविड यांनी यावेळी भारतीय ' अ ' संघाने केलेल्या ब्रिटनच्या दौऱ्यातील पंतच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, " आम्ही यापूर्वी ब्रिटनचा दौरा केला होता, त्यामध्ये पंतने चांदली कामगिरी केली होती. या दौऱ्यात पंतने 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती, त्याचबरोबर जयंत यादवबरोबर शतकी भागीदारीही रचली होती. त्यामुळे इंग्लंडचे वातावरण आणि खेळपटट्या पंतसाठी नवीन नाहीत."

टॅग्स :राहूल द्रविडभारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट