Join us  

रिषभ पंतचे दिवस भरले; अखेरची संधी देणार आणि फेल झाला तर घरी बसवणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाला संधी देण्यात यावी, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 9:29 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  : भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे आता दिवस भरल्याचेच दिसत आहे. कारण आता त्याला अखेरीच संधी देण्यात येणार आहे. जर या संधीचे सोने जर पंतला करता आले नाही, तर त्याला थेट संघाबाहेर काढणार असल्याचे समजते आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात पंतला संधी मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

कसोटी सामन्यांमध्येही पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्येही पंत नापास ठरलेला दिसत आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाला संधी देण्यात यावी, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षण कोण करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

निवड समितीला पंतला अखेरची संधी द्यायची आहे. त्यामुळे त्याला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात संधी द्यावी, असे निवड समितीला वाटते. त्याचबरोबर संघ व्यवस्थापनालाही पंतला अखेरची संधी द्यायची आहे. त्यामुळे पंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दिसेल. पण जर तो या मालिकेत पुन्हा नापास ठरला तर त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंद होतील, असे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते.

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकावृद्धिमान साहा