Join us  

Rishabh Pant : भारताच्या ग्रामीण भागात रिषभ पंत वैद्यकिय सुविधा पुरवणार; ऑक्सिजन सिलेंडर, बेड्ससाठी उभारणार निधी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 4:07 PM

Open in App

कोरोना व्हायरसची (CoronaVirus) दुसरी लाट लसीकरण आणि बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन लावूनही थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग नव्या रुग्णांचा आकडा हा चार लाखांच्या पार येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी क्रिकेटपटूही पुढे आले आहेत. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) हाही पुढे आला आहे. त्यानं विशेष करून ग्रामीण भारताकडे लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार केला आहे. ३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!

रिषभ पंतनं ट्विट केलं की,''देशात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहून मन सुन्न झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे ज्यांनी जवळचे व्यक्ती गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी दुःख व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, ही मी प्रार्थना करतो. चांगलं काही साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केल्यास, यश हे मिळतेच, हे मी खेळामुळेच शिकलो आहे. मी सर्व फ्रटलाईन वर्कर्सना सॅल्यूट करतो. '' दिल्ली असुरक्षित, न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बदलला प्लान; पोहोचले मालदिवला अन् कोणाला पत्ताच नाही!

''मी हेमकुंत फाऊंडेशनला ( Hemkunt Foundation) सहकार्य करणार आहे. ही संस्था ऑक्सिजन सिलेंडर्स, बेड्स, कोव्हिड रिलीफ किट आणि अनेक वस्तू देशातील कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी निधी गोळा करतात. मी या संस्थेसह देशातीत ग्रामीण भागात काम करण्यास उत्सुक आहे. आजही देशातील अनेक ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकिय सुविधा नाहीत. मी इतरांनाही या सामाजिक कार्यात मदत करण्यासाठी आवाहन करतो,''असेही तो म्हणाला.

टॅग्स :रिषभ पंतकोरोना वायरस बातम्या