Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rishabh Pant Run Out : कोलांटी उडीचा कॉन्फिडन्स! पंत ओपनिंगला आला, पण जोडीदारानेच केला घात

 गत हंगामात शतकासह केला होता शेवट; यंदाच्या हंगामात सलामीचा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:35 IST

Open in App

 Rishabh Pant Run Out : गत हंगामातील अखेरच्या सामन्यात शतक अन् त्यानंतरची 'त्या' कोलांटी उडीमुळे यंदाच्या हंगामात लखनौच्या ताफ्यात सलामीचा नवा प्रयोग पाहायला मिळाला. कर्णधार रिषभ पंत याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सकडून डावाची सुरुवात केली. पण दुर्देवीरित्या धावबाद होऊन रिषभ पंतला तंबूचा रस्ता धरावा लागला. सलामीला खेळण्याचा त्याचा डाव जोडीदारामुळेच फसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर

आपल्याच जोडीदारामुळे झाला घात, तिसऱ्या पंचाने निर्णय देण्याआधी पंतने सोडलं मैदान  

ऑस्ट्रेलियन  मिचेल मार्शच्या साथीनं रिषभ पंतने लखनौ सुपर जाएंट्सच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या दोन षटकात  १६ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण मुकेश कुमार घेऊन आलेल्या तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मिचेल मार्शनं सरळ गोलंदाजाच्या दिशेनं फटका मारला अन् नॉन स्ट्राइक एन्डला रिषभ पंत फसला. चेंडू मुकेश कुमारच्या हाताला स्पर्श करून स्टंपवर लागला. पंतनं क्रिज सोडल्यामुळे त्याच्यावर धावबाद होण्याची वेळ आली. तिसऱ्या पंचाचा निर्णय येण्याआधीच पंतने मैदान सोडले.  तो मोठ्या आत्मविश्वासाने  सलामीला आला, पण जोडीदारामुळेच त्याचा घात झाल्याचे पाहायला मिळाले.

सहा सामने अन् सलामीवीराच्या रुपात एक अर्धशतक

रिषभ पंतने याआधी IPL मध्ये फक्त पाच वेळा डावाी सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. यात त्याने पहिल्या सामन्यात ४० चेंडूत केलेल्या ६९ धावांच्या खेळीशिवाय त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. गत हंगामातील शतकानंतर उंचावलेल्या आत्मविश्वासाने तो एक मोठा डाव खेळेल, असे वाटत होते. पण धावबाद झाल्यामुळे हा निर्णय फसला. त्याला ९ चेंडूत ७ धावा करून माघारी परतावे लागले. 

पंतची आयपीएलमधील सलामीवीराच्या रुपात कामगिरी

६९ (४०)२ (८)३२ (२६)१ (२)२१ (१८)७ (९) 

 गत हंगामात शतकासह केला होता शेवट 

रिषभ पंत IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौच्या संघाने त्याच्यासाठी २७ कोटी रुपये मोजले आहेत. गत हंगामात किंमतीप्रमाणे हिंमत दाखवू शकला नाही. पण शेवटच्या सामन्यात बंगळुरुविरुद्ध त्याने शतक झळकावले होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rishabh Pant Run Out: Opening Gamble Fails Due to Partner's Error

Web Summary : Rishabh Pant's opening experiment for Lucknow soured after a run-out against Delhi, triggered by his partner's shot deflecting off the bowler and onto the stumps. Despite past IPL starts and a high price tag, Pant's innings ended prematurely at 7 runs.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत