Join us

Rishabh Pant Run Out Controversy, IPL 2022 GT vs DC: चेंडू हातात येण्याआधीच स्टंपला लागला पाय, तरीही फलंदाज OUT.. पाहा नियम काय सांगतो? (Video)

चेंडू हातातही आलेला नसताना पाय लागून स्टंपमधील लाईट पेटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 18:37 IST

Open in App

Rishabh Pant Run Out Controversy, IPL 2022 GT vs DC: Mumbai indians ला दिमाखात पराभूत करणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुजरात टायटन्ससमोर पराभूत झाला. शुबमन गिलच्या दमदार ८४ धावांच्या खेळीमुळे गुजरातने दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले होते. पण दिल्लीच्या संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावाच करता आल्या. सामन्यात रिषभ पंत आणि ललित यादव फलंदाजी करत असताना एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली. (Lalit Yadav Wicket)

१२व्या षटकात विजय शंकर गोलंदाजी करत असताना रिषभ पंतने चेंडू टोलवला. पण धाव घेताना ललित यादव क्रीजमध्ये पोहोचण्या आधीच विजय शंकरने स्टंपवरील बेल्स उडवली. रिप्ले मध्ये मात्र वेगळंच चित्र दिसलं. विजय शंकरच्या हातात चेंडू येण्याआधीच त्याचा पाय स्टंपला लागून एक बेल्स जमिनीवर पडली होती. त्यानंतर जेव्हा चेंडू हातात आला तेव्हा त्याने चेंडूने दुसरी बेल्स उडवली. त्यामुळे अशा परिस्थितीत फलंदाज नक्की बाद की नाबाद, यावरून चर्चा रंगल्या. पण क्रिकेटच्या नियमानुसार ललित यादवला बाद ठरवण्यात आले. पाहा व्हिडीओ-

काय आहे रन-आऊटचा नियम

क्रिकेटच्या नियमानुसार, स्टंपवरील दोन्ही बेल्स आधीच पडल्या असतील तर केवळ चेंडू स्टंपला लावणं पुरेसं नसतं. अशा वेळी स्टंप जमिनीतील उखडून हातात घ्यावा लागतो आणि त्याला चेंडू लावून रन आऊटचं अपील करता येतं. पण स्टंपवरील एक बेल्स पडली असेल आणि दुसरी बेल्स स्टंपवरच असेल तर चेंडू हातात आल्यावर स्टंपवरील बेल्स उडवून रन आऊट करता येतं. याच नियमानुसार, अंपायरने ललित यादवला माघारी धाडलं.

दरम्यान, रिषभ पंतने या निर्णयाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली होती. तसेच पंचांशी चर्चादेखील केली होती. पण अखेर नियमाला अनुसरून निर्णय झाला असल्याने त्यालाही फार काही करता आलं नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतगुजरात टायटन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App