नवी दिल्ली : भारताच्या टी-२० संघात पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेला ऋषभ पंत २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये लखनौ संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज आहे. लखनौचा कर्णधार म्हणून पंतसाठी हा हंगाम अत्यंत निर्णायक ठरेल. २०२५ साली झालेल्या मेगा लिलावात या फ्रँचाइजीने त्याला विक्रमी २७ कोटी रुपयांत संघात घेतले होते.
गेल्या सत्रातील निराशाजनक कामगिरीनंतर, यंदा जर पंतने चांगली कामगिरी केली, तर भविष्यात तो भारताच्या टी-२० योजनांचा भाग बनू शकतो. सध्या तो केवळ कसोटी संघाचा सदस्य आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो लोकेश राहुलचा पर्यायी यष्टिरक्षक आहे. २०२४ साली भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर पंतची टी-२० संघातील जागा गेली होती. संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या कामगिरीमुळे संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला विशेष कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे पंतसाठी आयपीएलचे आगामी सत्र महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या सत्रात पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, शेवटच्या काही सामन्यांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.
पंतवर असणार दबाव : फाफ
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस याने यंदा ऋषभ पंतवर सर्वाधिक दबाव असेल, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘माझ्या मते, या सत्रात पंतवर सर्वाधिक दबाव असेल. काही खेळाडू किमतीच्या दबावात चांगली कामगिरी करतात, तर काहींना ते जमत नाही. मागील सत्र त्याच्यासाठी कठीण गेले. संघ संघर्ष करत होता आणि फलंदाज म्हणून त्यालाही अडचणी आल्या होत्या.’
प्रशिक्षकांचेही एकमत
मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि सहायक स्टाफ यांच्यात पंतच्या फलंदाजी क्रमाबाबत एकमत आहे. आयपीएल सूत्रांच्या मते, ‘संघ व्यवस्थापन आणि पंत दोघेही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे योग्य मानतात.
यंदा त्यांच्या आघाडीच्या फळीत एडेन मार्क्रम, मिचेल मार्श आणि पंत असतील. गेल्या सत्रात पंतने १३३.१७ च्या स्ट्राइक रेटने २६९ धावा केल्या होत्या. यामध्ये नाबाद ११८ धावांच्या शानदार खेळीचाही समावेश आहे. लखनौच्या मधल्या फळीत पूरनसह आयुष बडोनी, अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांचा समावेश आहे.
पंतची आयपीएल कामगिरी
सामने : १२५डाव : १२३धावा : ३,५५३सर्वोच्च : १२८*शतके : २अर्धशतके : १९झेल : ८० यष्टिचीत : २४
Web Summary : Rishabh Pant aims for a T20 comeback, batting at number three for Lucknow in the IPL. Crucial season ahead to regain his spot in the Indian team amidst competition from Samson and Kishan, says Faf du Plessis.
Web Summary : ऋषभ पंत का टी20 टीम में वापसी का लक्ष्य, आईपीएल में लखनऊ के लिए तीसरे नंबर पर बल्लेबाजी करेंगे। सैमसन और किशन से प्रतिस्पर्धा के बीच यह सीजन उनके लिए महत्वपूर्ण है, फाफ डु प्लेसिस ने कहा।