Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 5th Match : लखनौ सुपर जाएंट्स फ्रँचायझी संघ आपल्या तगड्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. या ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजीत मिचेल मार्श पासून ते अगदी मार्करम, पूरन आणि खुद्द कर्णधार रिषभ पंत एकहाती सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारे आहेत. घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सेनापती कमनशिबी ठरल्यावर सगळा संघच कोलमडल्याचे पाहायला मिळाले. लखनौच्या एकाना स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरेला लखनौ सुपर जाएंट्सचा संघ १४१ धावांत ऑलआउट झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत दुर्देवीरित्या फसला अन् तगडी फलंदाजी कोलमडली
आयपीएल २०२६ च्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्यााचा निर्णय घेतला. रिषभ पंतने मिचेल मार्शच्या साथीनं डावाची सुरुवात केली. पण तिसऱ्या षटकात तो दुर्देवीरित्या धावबाद झाला. त्याने फक्त ७ धावा केल्या. ज्याच्या फटक्यामुळे पंत बाद झाला त्या मिचेल मार्शनं २८ चेंडूत केलेल्या ३५ धावा आणि अखेरच्या षटकात अब्दुल समद याने २५ चेंडूत केलेल्या ३६ धावा वगळता कोणत्याही फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. एडन मार्करम याने ११ धावांवर तर तुफान फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या निकोलस पूरन याने अवघ्या ८ धावांवर तलवार म्यान केली.
Rishabh Pant Run Out : कोलांटी उडीचा कॉन्फिडन्स! पंत ओपनिंगला आला, पण जोडीदारानेच केला घात
लुंगी एनिग्डीसह टी. नटराजनचा भेदक मारा अन्...
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याचा निर्णय सार्थ ठरवताना लुंगी एनिग्डी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत लखनौच्या संघाचे कंबरडे मोडले. याशिवाय कुलदीप यादवनं २ तर कर्णधार अक्षर पटेल याने एक विकेट घेतली. तगडी फलंदाजी असलेल्या लखनौच्या संघाला सलामीच्या सामन्यात निर्धारित २० षटकेही मैदानात टिकता आले नाही. ही गोष्ट संघाची चिंता वाढवणारी आहे.
Web Summary : Lucknow Super Giants collapsed against Delhi Capitals after an unlucky dismissal of captain Rishabh Pant. Despite Marsh's 35 and Samad's 36, LSG were all out for 141. Ngidi and Natarajan took 3 wickets each, leading DC to dominate the match.
Web Summary : कप्तान ऋषभ पंत के दुर्भाग्यपूर्ण आउट होने के बाद लखनऊ सुपर जायंट्स दिल्ली कैपिटल्स के खिलाफ धराशायी हो गई। मार्श के 35 और समद के 36 रनों के बावजूद, एलएसजी 141 रन पर ऑल आउट हो गई। नगीदी और नटराजन ने 3-3 विकेट लेकर डीसी को मैच में दबदबा बनाने में मदद की।