Join us
Daily Top 2Weekly Top 5

KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला

अर्जुन तेंडुलकर पुन्हा बाकावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:40 IST

Open in App

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील १५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. LSG चा संघ यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसरीकडे पावसाच्या व्यत्ययामुळे पंजाब किंग्स विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मिळालेल्या एका गुणासह अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील KKR च्या संघाने खाते उघडले असले तरी ते अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अर्जुन तेंडुलकर पुन्हा बाकावरच

KKR विरुद्धच्या सामन्याआधी लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरचा नेट्स प्रॅक्टिसमधील एक खास व्हिडिओ शेअर केला होता. त्याचा यॉर्करचा भेदक मारा पाहून KKR विरुद्ध त्याला नव्या संघाकडून पदार्पणाची संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. पण आणखी एका सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली आहे. 

टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?

पंत म्हणाला, फलंदाजांसह गोलंदाजांवर विश्वास

नाणेफेकीनंतर रिषभ पंत म्हणाला की, "आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा आहे. आधीही सांगितल्याप्रमाणे, आमच्या गोलंदाजांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्यासाठी चांगलं काम करतील. पहिल्या विजयामुळे संघातील वातावरण नक्कीच सकारात्मक आहे. कोणत्याही बदलाशिवाय आम्ही  मैदानात उतरत आहोत, हे पंतनं स्पष्ट केले. आघाडीची फलंदाजी मजबूत आहे," असेही तो म्हणाला. 

कॅमरून ग्रीन फक्त बॅटिंगच करणार!

नाणेफेकीचा कौल हा प्लॅन पलटणारा ठरला, असे सांगताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्हालाही आधी गोलंदाजी करायची होती.  या सामन्यात आम्ही ब्लेसिंग मुझारबानीच्या जागी सुनील नरेनसह मैदानात उतरत आहोत. वरुण चक्रवर्ती अजूनही दुखापतीतून सावरला नाही, त्यामुळे तो संघाचा भाग नाही, असे अजिंक्य रहाणेनं स्पष्ट केले. कॅमरून ग्रीन गोलंदाजी करू लागला की, आमचे कॉम्बिनेशन अजून मजबूत होईल, असा विश्वासह त्याने व्यक्त केला आहे.    कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमेरुन ग्रीन, अंग्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, नवदीप सैनी, कार्तिक त्यागी

  • कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर - मनीष पांडे, वैभव अरोरा, तेजस्वी दहिया, राहुल त्रिपाठी, टिम सेफर्ट

लखनौ सुपर जाएंट्स  प्लेइंग इलेव्हन 

 मिचेल मार्श, एडन मार्करम, रिषभ पंत (यष्टीरक्षक फलंदाज), निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मनिमरन सिद्धार्थ, आवेश खान, मोहम्मद शमी, दिग्वेश सिंग राठी, प्रिन्स यादव

  • लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेयर - आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रेट्झके, शाहबाज अहमद, मयंक यादव, हिम्मत सिंग
English
हिंदी सारांश
Web Title : Arjun Tendulkar benched; Lucknow opts to bowl against Kolkata.

Web Summary : Lucknow chose to bowl first against Kolkata. Arjun Tendulkar remained out of the playing eleven. KKR, under Rahane, sought their first win. Both teams announced their playing elevens, with strategic changes to their lineups for the match.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सअजिंक्य रहाणेलखनौ सुपर जायंट्सरिषभ पंतअर्जुन तेंडुलकर