Join us

रिषभ पंतची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री पक्की अन् विराट...! रोहित शर्माचा संघाच्या घोषणेची तारीख ठरली 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होतोय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 16:27 IST

Open in App

India's T20 World Cup squad - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर लगेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होतोय.. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी संघ निवड करण्यापूर्वी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय निवड समिती लक्ष ठेवून आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंतचे ट्वेंटी-२० संघातील स्थान जवळपास पक्के झाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये रिषभचा कार अपघात झाला होता आणि त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याने आयपीएल २०२४ मधून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि निवड समिती त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या फिटनेसवरही लक्ष ठेवले जाईल. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निवडण्यासाठी निवड समिती एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे वृत्त समोर येत आहे.  आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अंदाज बऱ्यापैकी अपेक्षित आहे. रिषभ पंतचे पुनरागमन हे एकमेव संभाव्य आश्चर्य असू शकते. पंतची आयपीएलमधील अलीकडची कामगिरी प्रभावी ठरली आहे. या जोरदार प्रदर्शनामुळे भारतीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला खात्री पटली आहे की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास तयार आहे.   

दरम्यान, विराट कोहलीच्या उपस्थितीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. पण, आयपीएल २०२४ मधील त्याचा फॉर्म पाहता निवड समिती त्याच्याकडे दुलर्क्ष करतील असे वाटत नाही. त्याने एका शतकासह ३०० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांचे सलामीचे स्थान पक्के असताना विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. पण, त्यामुळे शुबमन गिलच्या समावेशावर प्रश्नचिन्ह उरतोय. युझवेंद्र चहलसमोर कुलदीप यादव व अक्षर पटेल यांचे आव्हान आहे. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचाही समावेश निश्चित आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रिषभ पंतविराट कोहली