Rishabh Pant Cook Pizza Video Goes Viral : क्रिकेटच्या मैदानात आपल्या खास शैलीनं लक्षवेधून घेणाऱ्या रिषभ पंतनं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेटच्या मैदानात विकेटमागे चपळाई अन् बॅट हातात घेतल्यावर स्फोटक फटकेबाजीचा नजराणा पेश करणाऱ्या पंतनं कुकिंगमध्ये हात आजमावलाय. पायाला झालेल्या दुखापतीनंतर मी फार काही करू शकत नाही. पण एवढं तर करूच शकतो, असे म्हणत त्याने किचनमधून शेफच्या रुपात आपलं दर्शन दिल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. पंतनं खास कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मी तुम्हाला आज पिझ्झा कसा तयार करायचा ते शिकवतो!
पंतनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जो खास व्हिडिओ शेअर केलाय त्यात तो म्हणतोय की, मी अगदी शेफ सारखा दिसतोय. आज मी तुम्हाला पिझ्झा कसा तयार करायचे ते शिकवणार आहे. मी शाकाहरी आहे. त्यामुळे पिझ्झाही शाकाहरीच असेल, असे सांगत पिझ्झा तयार करताना कोणत्या गोष्टीत गोंधळ उडतोय तेही त्याने सांगितल्याचे दिसते.
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाला होता पंत
भारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या पायाला दुखापत झाली. क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप फटका खेळताना चेंडू त्याच्या पाच्या करंगळीच्या बाजूला लागला. पायाची करंगळी फॅक्चर झाल्यावरही तो फलंदाजीला मैदानात उतरला. पण त्यानंतर पाचव्या कसोटीला त्याला मुकावे लागले. या दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेलाही तो मुकणार आहे.
इंग्लंड दौरा गाजवला
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या भात्यातून २ शतके पाहायला मिळाली. दुखापतीनंतर मैदानात उतरुन त्याने उपयुक्त अर्धशतकही झळकावले. या मालिकेतील ४ सामन्यात त्याने ६८.४२ च्या सरासरीनं ४७९ धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता. दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला जवळपास ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यातून सावरून तो पुन्हा दमदार कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Web Title: Rishabh Pant Cook Pizza With A Broken Foot Recipes Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.