Join us  

उगाच चर्चा नको; रिषभ पंतनं बॉलिवूड अभिनेत्रीला WhatsApp वर केलं ब्लॉक!

टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांनेही प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:09 PM

Open in App

हार्दिक पांड्यानं नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हार्दिकनंतर टीम इंडियाचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांनेही प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण, रिषभचे नाव हार्दिकची कथित Ex गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्रीसोबतही नाव जोडलं गेलं होतं. रिषभ व ती अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, रिषभनं या चर्चांना कंटाळून त्या अभिनेत्रीला WhatsApp वर ब्लॉक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिषभ पंतचीही फिल्मी स्टाईल अदाकारी; प्रेयसीसोबत रोमँटिक सफर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान रिषभ आणि ती अभिनेत्री मुंबईच्या एका हॉटेलमध्ये सोबत डिनर करताना पाहिले गेले होते. त्यानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, रिषभनं नववर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर प्रेयसी इशा नेगीसोबतचे फोटो शेअर करताना त्या चर्चांना पूर्णविराम लावला.

ही अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौटेला. 'पिंक विला' च्या माहितीनुसार उर्वशी रिषभला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याच्याकडून कोणतेच उत्तर मिळत नाही. रिषभने WhatsApp वर ब्लॉक केल्यामुळे तिला मॅसेजही पाठवता येत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार हा निर्णय आम्ही दोघांनी सामंजस्यानं घेतल्याचं उर्वशीनं सांगितले आहे.

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेलाहार्दिक पांड्या