Join us  

R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला

Rishabh Pant letting me down: R Ashwin ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 9:59 AM

Open in App

भारतीय संघाचा सीनियर फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत. हनुमा विहारी आणि अश्विननं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दमवलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्यानं सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या आणि शतकी खेळीही केली होती. विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!

चेन्नईत झालेल्या कसोटीत अश्विननं शतक झळकावलं. चेन्नईच्या या कसोटीसाठीच्या खेळपट्टीवरून कर्णधार जो रूटसह इंग्लंड संघानं नाराजी व्यक्ती केली होती. त्याच खेळपट्टीवर अश्विननं शतक झळकावून सडेतोड उत्तर दिले. पण, जेव्हा DRS ( Decision Review System ) चा प्रश्न येतो, तेव्हा अश्विनचे निर्णय चुकलेले पाहायला मिळाले.  

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांचे DRS कॉल चुकलेले पाहायला मिळाले आणि त्याचा टीम इंडियाला फटकाही बसला. यापूर्वी DRS कॉल कधी चुकले नव्हते, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत काही निर्णय चुकले, हे अश्विननं मान्य केलं. ''DRSच्या बाबात लोकांनी माझ्याबद्दल एक मत बनवलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी DRS चे निर्णय चुकलेले नव्हते. DRS घेताना आपण यष्टिरक्षकावर अवलंबून असतो.'' लोकेश राहुल चॅम्पियन!; सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या मित्राची विराट कोहलीकडून पाठराखण

याबाबत पुढे म्हणताना अश्विननं यष्टिरक्षक रिषभ पंतचे कान टोचले. रिषभनं मला तोंडघशी पाडले, असे तो म्हणाला,'' रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले. मी त्याच्याशी याबाबत चर्चा केली. DRSचा निर्णय चुकल्यानं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही भडकले होते.'' भारतानं इंग्लंडविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. १८-२२ जूनला न्यूझीलंडिरुद्ध साऊदॅम्प्ट येथे हा सामना होणार आहे.  विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम

टॅग्स :आर अश्विनरिषभ पंतभारत विरुद्ध इंग्लंड