भारतीय क्रिकेट संघातील फिनिशर रिंकू सिंह झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाच्या कॅम्पमधून बाहेर पडत थेट ग्रेटर नोएडाला पोहचला. वडिलांची प्रकृती खालावल्याची बातमी कळताच त्याने चेन्नईतून निघत वडिलांवर उपचार सुरु असलेले रुग्णालय गाठले. सुपर ८ फेरीतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले होते. यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
वडील व्हेंटिलटवर असल्याचे कळताच रिंकू सिंहनं सोडली होती संघाची साथ
भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्धच्या लढतीच्या तयारीत असताना रिंकू सिंहने अचानक संघाची साथ सोडली होती. रिंकूचे वडील खानचंद सिंह यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यामुळेच रिंकू सिंह मंगळवारी तातडीनं चेन्नईहून ग्रेटर नोएडाला परतला होता.
रिंकू स्पर्धेतून बाहेर पडणार? फलंदाजी प्रशिक्षकानी दिली माहिती
वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु असताना रिंकू सिंह याने टीम इंडियाच्या ताफ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी चेन्नई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संताशु कोटक यांनी झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी रिंकू सिंह संघासोबत असेल, याची पुष्टी केली. पत्रकार परिषदेत कोटक म्हणाले, "रिंकू सिंह आज संध्याकाळी परत येत आहे. त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्याला जावे लागले. आम्हाला अपेक्षा आहे की, तो उशिरापर्यंत आमच्यासोबत असेल." या वक्तव्यामुळे रिंकू स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र तो पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिंकूने यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी सर्व पाच सामने खेळले आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त २४ धावा आल्या आहेत. पण उर्वरित दोन सामन्यात तेही नेट रनरेटचा फॅक्टर महत्त्वाचा असताना तो संघासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.
क्रिकेटरच्या वडिलांना नेमकं काय झालं आहे?
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, रिंकूचे वडील चौथ्या टप्प्यातील यकृताचा कर्करोग आजाराने त्रस्त असून सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे ते अनेक वर्षे एका गॅस कंपनीसाठी एलपीजी सिलेंडर वितरक म्हणून काम करत होते. कौटुंबिक अडचणींवर मात करत त्यांनी लेकाला क्रिकेटर बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. IPL मध्ये खास छाप सोडल्यावर रिंकू फिनिशरच्या रुपात टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे.
Web Summary : Rinku Singh left the Indian team camp to be with his ailing father in Greater Noida. His father, battling cancer, is on a ventilator. Rinku has rejoined the team; his participation in upcoming matches remains uncertain.
Web Summary : रिंकू सिंह अपने बीमार पिता के साथ रहने के लिए भारतीय टीम शिविर से ग्रेटर नोएडा चले गए। उनके पिता कैंसर से जूझ रहे हैं और वेंटिलेटर पर हैं। रिंकू टीम में फिर से शामिल हो गए हैं; आगामी मैचों में उनकी भागीदारी अनिश्चित है।