Join us

IPL 2025 : KKR ने रिटेन केलं नाही तर 'या' संघाकडून खेळणार; Rinku Singh ची 'मन की बात'

rinku singh news : रिंकू सिंगचे मोठे विधान.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:02 IST

Open in App

rinku singh kkr : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलमध्ये चमकदार  कामगिरी करून अनेक खेळाडूंनी प्रसिद्धी मिळवली. यातीलच एक मोठे नाव म्हणजे रिंकू सिंग. रिंकूने एकाच षटकात पाच षटकार ठोकून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. गुजरातच्या तोंडचा घास पळवून केकेआरला विजय मिळवून देणारा युवा खेळाडू रातोरात स्टार झाला. आता मात्र रिंकूने केकेआरच्या फ्रँचायझीने रिटेन न केल्यास काय करणार याबद्दल उघड भाष्य केले आहे. 

आयपीएल गाजवणाऱ्या रिंकूला बक्षीस म्हणून लगेचच भारतीय संघाचे तिकीट मिळाले. त्याने १८ ऑगस्ट २०२३ रोजी डब्लिन येथे आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १९ डिसेंबर २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दरम्यान, रिंकू सिंगने सांगितले की केकेआरने लिलावापूर्वी त्याला रिलीज केले तर तो आरसीबीमध्ये सामील होईल. मी विराट कोहलीचा तगडा फॅन असल्याने त्यांच्या संघातून खेळायला आवडेल असे रिंकूने स्पष्ट केले. 

तसेच सूर्यकुमार यादव हा एक शांत आणि संयमी कर्णधार आहे. मी रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळलो आहे.  तो देखील एक दिग्गज कर्णधार आहे, असेही रिंकूने सांगितले. तो 'स्पोर्ट्स तक'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. रिंकूचा ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. यानंतर त्याला झिम्बाब्बेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संधी मिळाली. शेवटच्या वेळी तो सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात श्रीलंकेविरूद्ध मालिका खेळताना दिसला होता. 

टॅग्स :रिंकू सिंगआयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर