Rinku Singh Priya Saroj Engagement Dance Video Goes Viral : भारतीय संघातील स्टार क्रिकेटर रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. यात आता एका खास व्हिडिओची भर पडलीये. ज्यात खासदार अन् रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज धमाल डान्स करताना दिसत आहे. खासदार पत्नीला डान्स करताना पाहून रिंकू सिंह तिच्याकडे फक्त अन् फक्त बघत बसल्याचेही या व्हिडिओत दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
खासदार प्रिया सरोज यांच्या जबरदस्त डान्स स्टेप्स, रिंकू कावरा बावरा होऊन बघतच राहिला
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला 'जब वी मेट' या शाहिद कूपर आणि करीना कपूर यांच्या चित्रपटातील 'नगाड़ा-नगाड़ा' गाणे वाजताना दिसत आहे. यात हसत हसत प्रिया सरोज जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसून येते. दुसरीकडे रिंकू सिंहचा मात्र कावरा बावरा होऊन लाजताना दिसतोय. तो स्टेप्स ट्राय करत फक्त अन् फक्त होणाऱ्या पत्नीचा डान्स बघत उभा राहिल्याचे दिसून येते.
रिंकून शाहरुखसोबत धरला होता ठेका, पण...
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ओपनिंग सेरेमनीतील कार्यक्रमात रिंकू सिंह हा कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत डान्स स्टेप्स करताना पाहायला मिळाले होते. बॅटिंगशिवाय इथंही कमी नाही याची झलकच त्याने दाखवून दिली होती. पण होणाऱ्या खासदार बायकोसमोर मात्र तो जाम लाजला. डान्स स्टेप्स दाखवण्यापेक्षा त्याने प्रिया सरोज यांच्या भन्नाट डान्सचा आनंद घेतल्याचे दिसून आले.
अडीच वर्षांपासूनची ओळख, आता आयुष्यभरासाठी जमलीये जोडी
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून धमक दाखवल्यावर रिंकू सिंह भारतीय टी-२० संघाचाही भाग आहे. फिनिशरच्या रुपात त्याने टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे प्रिया सरोज या खासदार आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून येते. ही जोडी अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होती. आता त्यांनी आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करण्यासाठी साखरपुड्याच्या रुपात पहिली पायरी चढली असून लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत.