Join us

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघाला ( सीएसके) शनिवारी धक्क्यांवर धक्के बसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:03 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्स संघाला ( सीएसके) शनिवारी धक्क्यांवर धक्के बसले. दीपक चहरसह सपोर्ट स्टाफमधील 12 सदस्यांना कोरोना झाल्याचे वृत्त शुक्रवारी समोर आले. यातून सारवण्यापूर्वीच संघाचा उपकर्णधर आणि महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैनानं आयपीएलमधून 'वैयक्तिक' कारणामुळे माघार घेतली. रैनाच्या या माघारीचे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आयपीएल होण्याची घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम रैनानं सरावाला सुरुवात केली होती आणि त्याचा व्हिडीओही त्यानं पोस्ट केला होता. पण, मग असं काय झालं की रैनानं तातडीनं दुबई सोडण्याचा निर्णय घेतला?

समोर आलेल्या वृत्तानुसार त्याच्यात आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात वाद झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवास यांनी Outlook ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''सुरेश रैनाच्या तडकाफडकी निर्णयानं आम्हाला थोडा धक्का बसला, परंतु धोनीनं सर्व परिस्थिती योग्य रितीनं हाताळली आहे.''

19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आत्ये भाऊ कौशल कुमार ( 32 वर्ष) आणि अपीन कुमार ( 24 वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे. आयपीएलमधून माघार घेण्याचे हे कारण सांगितले जात आहे. 

पण, समोर आलेल्या नव्या अपडेट्सनुसार दुबईत दिलेल्या हॉटेल रुमवर रैना नाखुश होता. बायो-बबलच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, त्याला जमत नव्हते. धोनीला जसा रुम दिला आहे, तसाच रूम त्यालाही हवा होता. रैनाच्या रुमला योग्य बालकनीही नव्हती आणि त्यामुळे तो नाराज होता. त्यात संघातील 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रैनाची भीती आणखी वाढली होती. 

त्यानं नक्की काय गमावलंय, याची जाण होईल- श्रीनिवास''तो कॉमेडियन प्राईमा डोन्नास, सारखा वागत आहे. चेन्नई सुपर किंग्स हे एक कुटुंब आहे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी याची जाण असायला हवी. तुम्ही नाखूष असाल, तर खुशाल जा. मी जबरदस्ती करणार नाही. काहीवेळा यश डोक्यात जाते,''असे श्रीनिवास म्हणाले.   

टॅग्स :आयपीएल 2020सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स