नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डेसाठी संघात स्थान मिळाले. त्याचवेळी अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने मोहम्मद शमी याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. पुढील तीन सामने पुणे(दि. २७), मुंबई (दि.२९)आणि त्रिवेंद्रम (१ नोव्हेंबर) येथे खेळले जातील.राष्टÑीय निवड समिती विंडीज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध एकूण सहा टी-२० सामन्यांसाठी आज शुक्रवारी पुण्यात संघ जाहीर करणार आहे. कर्णधार विराट कोहली विंडीजविरुद्ध टी-२० खेळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शमीने गुवाहाटीत ८१ तसेच विशखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात ५९ धावा मोजल्या होत्या. उमेश यादवने देखील दोन सामन्यात १४२ धावा दिल्या, पण त्याला संघात कायम ठेवण्यात आले आहे. भुवनेश्वर आणि बुमराह हे आशिया चषक तसेच विंडीजविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत खेळले नव्हते. पुढील महत्त्वांच्या स्पर्धांच्या दृष्टीने दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजांना अपेक्षित मारा करण्यात यश आले नसल्याने दोघांची संघात निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचा आक्रमक फलंदाज केदार जाधवचा उर्वरीत तीन सामन्यांसाठी विचार झालेला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर देवधर ट्रॉफीतून पुनरागमन केलेल्या केदारने २५ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. मात्र काही सामने खेळल्यानंतर त्याचा टीम इंडियासाठी विचार होऊ शकतो.त्याचप्रमाणे मुंबईकर युवा सलामीवीर पृथ्वी शॉची निवड भारतीय संघात होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगली होती. कसोटी मालिकेत छाप पाडल्यानंतर त्याला एकदिवसीय संघात संधी मिळण्याची खात्री होती. मात्र देवधर ट्रॉफीदरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आता मैदानाबाहेर बसावे लागले.।भारतीय संघविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल आणि मनीष पांडे.।खेळात सांघिक सातत्य आणावे लागेल : होपशानदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना ‘टाय’ करणारा वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज शाय होप याने उर्वरित सामन्यात सांघिक योगदानासाठी खेळात सातत्याची गरज राहील, असे म्हटले आहे.सामन्यानंतर तो म्हणाला, ‘अशा प्रकारच्या खेळीमुळे आत्मविश्वास उंचावतो. प्रत्येक खेळीनंतर अनुभवात भर पडले. सातत्यपूर्ण कामगिरीची आम्हाला सवय करून घ्यावीच लागेल.’ विजयासाठी ३२२ धावांचे लक्ष्य गाठणाताना होपने उमेश यादवच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना बरोबरीत सोडविला.‘अखेरचा चेंडू वाईड यॉर्कर टाकला जाईल याची मला कल्पना होतीच. मला तर खेळायचे होतेच. चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही, पण मी मारलेला स्ट्रोक पुरेसा होता,’ असेही होप याने म्हटले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भुवी, बुमराह यांचे पुनरागमन; शमी बाहेर, टी२० संघाची घोषणा आज
भुवी, बुमराह यांचे पुनरागमन; शमी बाहेर, टी२० संघाची घोषणा आज
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डेसाठी संघात स्थान मिळाले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:48 IST