Join us  

उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवा, ‘आयसीसी’कडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मागणी

सिडनी : नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना रद्द करावा लागल्याने ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 2:01 AM

Open in App

सिडनी : नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. हा सामना रद्द करावा लागल्याने भारताला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला, तर इंग्लंडला न खेळताच परतावे लागले. अशी स्थिती पुरुषांच्या विश्वचषकावेळी होऊ नये. यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलिया आयसीसीशी चर्चा करणार आहे. आॅस्ट्रेलियात २०२० मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवावा, अशी मागणी आॅस्ट्रेलिया करणार आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हा विश्वचषक होणार आहे. यासाठी आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात यावा, असा ठराव मांडण्याच्या विचारात आॅस्ट्रेलिया आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या महिला विश्वचषक स्पर्र्धेवेळी राखीव दिवस ठेवण्यास आयसीसीने परवानगी दिली नव्हती.आॅस्ट्रेलियात होणाºया विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना१५ नोव्हेंबरला मेलबोर्न येथे होणार आहे. फक्त अंतिम सामन्यासाठीच आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला आहे. मात्र, पुरुषांच्या बाद फेरीच्या सामन्यासाठीही राखीव दिवस असावा, अशी आॅस्ट्रेलियाची मागणी आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.आॅस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, जून-जुलै महिन्यात आयसीसीच्या क्रिकेट समितीची बैठक होणार आहे. यावेळी अन्य सदस्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.क्रिकेट आॅस्ट्रेलियाकडून या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्टस जाणार आहेत.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया