Join us  

ICC T20 World Cup : भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!

ICC T20 World Cup, Venue BCCI ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्याने होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:24 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या  ( IPL 2021) १४व्या पर्वाचे वेळापत्रक नुकतंच BCCIनं जाहीर केलं. कोरोना व्हायरसमुळे गतवर्षीची आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती, परंतु यंदा ती भारतातच खेळवण्याचा निर्धार BCCIनं केला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्याने होईल आणि अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे होईल. आयपीएलचे यशस्वी आयोजन हे BCCIसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण  यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ( ICC T20 World Cup 2021) भारतात होणार आहे. त्याच्या तयारीचा पाया आयपीएल आयोजनातून रचला जाणार आहे. आयपीएल २०२१साठी निवडण्यात आलेल्या सहा स्टेडियमवरच ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. ( IPL 2021 Venues Could Host ICC T20 World Cup Matches Too)  पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जाणार आहे. २०१६मध्ये भारतात ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केलं गेलं होतं. पण, यंदा कोरोना व्हायरसमुळे BCCIसमोरील आव्हानं अधिक वाढली आहेत. अशात बीसीसीआयला आयपीएलच्या यशस्वी आयोजन करावेच लागेल. सुरूवातीला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यांसाठी ८ शहरांचा विचार सुरू होता. १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा ८ ठिकाणांवर खेळवण्यात येणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्व परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आयपीएलसाठी निवडलेल्या मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू व कोलकाता या सहा शहरांमध्येच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे. लोकेश राहुलला नेमकं खेळवायचं कुठे?; Playing XI निवडताना विराट कोहलीची डोकेदुखी वाढली

आयसीसी नियमानुसार वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या ठिकाणांची घोषणा सहा महिने आधीच करावी लागते आणि बीसीसीआय तशी घोषणा लवकरच करेल, अशी अपेक्षा आहे. मोहाली व धर्माशाला यांचा पत्ता कट होणार आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलवरून चर्चा सुरू आहे. चेन्नई व बंगळुरू येथे सेमीफायनलचे सामने होण्याची शक्यता अधिक आहे, तर अहमदाबाद येथे फायनल खेळवली जाईल. T Natarajan दुखापतग्रस्त; वरुण चक्रवर्थी, टेवाटिया फिटनेस टेस्टमध्ये नापास, टीम इंडिया मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला बोलवणार!

टॅग्स :नरेंद्र मोदी स्टेडियमबीसीसीआयभारत विरुद्ध इंग्लंडआयपीएलआयसीसी विश्वचषक टी-२०