Join us

बाकावर बसून राहिले, तरी झाले मालामाल! हे आहेत तीन परदेशी खेळाडू...

सामना न खेळताही हे खेळाडू मात्र मालामाल बनले. ते खेळाडू कोण, पाहूया....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 05:44 IST

Open in App

आयपीएल २०२३ निर्णायक टप्प्यात आहे.  प्ले ऑफचा धडाका गाजत असून, त्याआधी साखळी लढतीत अनेक खेळाडूंनी कामगिरीचा ठसा उमटविला.  त्याचवेळी काही खेळाडू असेही होते, की ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी लाभली नाही. सामना न खेळताही हे खेळाडू मात्र मालामाल बनले. ते खेळाडू कोण, पाहूया....

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दिल्ली कॅपिटल्स संघात होता.  १४ पैकी एकही सामना खेळायला मिळाला नाही. लिलावात दिल्लीने त्याला ५० लाखांत खरेदी केले होते.  याआधी तो आयपीएलचे १४ सामने खेळला. त्याने २५ गडी बाद केले आहेत.

न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन आरसीबीचा खेळाडू. त्याच्यावर संघाने ८० लाख खर्च केले. तथापि संपूर्ण सत्रातील १४ सामन्यात त्याला एकदाही संधी दिली नाही. संपूर्ण सत्रादरम्यान तो बाकावर बसून राहिला.

द. आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज  राजस्थान रॉयल्स संघात होता. त्याला मिनी लिलावात ५० लाख रुपयांत संघात स्थान देण्यात आले.  त्याच्यावर केकेआरनेही बोली लावली होती. मात्र, राजस्थानने बाजी मारली. यंदाच्या सत्रात १४पैकी एकाही सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही.

टॅग्स :आयपीएल २०२३
Open in App