Join us  

भारताला ‘क्वारंटाईन’मध्ये दिलासा, केवळ ३ दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी, ईसीबीचे नियम बदलण्यात यश

Indian Cricket Team News: २ जून रोजी   इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 5:44 AM

Open in App

मुंबई : ‘इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) केवळ तीन दिवसांचा  क्वारंटाईन कालावधी ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रस्ताव शनिवारी मान्य केला. यामुळे २ जून रोजी   इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील.याआधी ईसीबीने भारतीय खेळाडूंना किमान दहा दिवस क्वारंटाईन होण्याची अट ठेवली होती. या अटीनुसार १२ जूनला क्वारंटाईन कालावधी संपणार होता. त्यामुळे केवळ सहा दिवसांचा कालावधी सरावासाठी मिळू शकला असता. १८ जूनपासून साऊदम्पटनच्या रोझ बाऊलमध्ये अंतिम सामना होणार आहे.ऑस्ट्रेलिया मॉडेलमागच्या वर्षी आयपीएलनंतर नोव्हेंबरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यावेळीही तीन दिवस क्वारंटाईनचा नियम पाळण्यात आला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सराव केला. शिवाय आपसात सराव सामनेही खेळले. हाॅटेलमध्ये मात्र खेळाडू खोलीबाहेर पडू शकत नव्हते. याच मॉडेलबाबत बीसीसीआयने ईसीबीला विनंती केली. चांगल्या सरावाच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते. दोन्ही संघांना मिळणार सूटभारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडू १९ मेपासून सध्या मुंबईत आहेत. कुणालाही सराव करण्याची परवानगी नाही. या दरम्यान वारंवार कोरोना चाचण्या होत आहेत. कुणी पॉझिटिव्ह आढळल्यास संघाबाहेर केले जाईल. दोन आठवड्यांचा कठोर क्वारंटाईन कालावधी आटोपताच दोन्ही संघ इंग्लंडकडे रवाना होतील. दोन्ही संघांना तीन दिवस क्वारंटाईनचा नियम लागू असल्याचे ईसीबीकडून कळविण्यात आले. पुरुष संघ साऊदम्पटनकडे रवाना होतील, तर महिला संघ ब्रिस्टलला जाणार आहे. महिला संघाला इंग्लंडविरुद्ध १८ जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. त्यानंतर वन डे आणि टी-२० मालिकादेखील खेळली जाईल. भारताचा इंग्लंड दौरादिनांक     कसोटी     संघ१८ ते २२ जून     डब्ल्ययूटीसी न्यूझीलंड४ ते ८ ऑगस्ट     पहिली    इंग्लंड१२ ते १६ ऑगस्ट     दुसरी      इंग्लंड२५ ते २९ ऑगस्ट     तिसरी     इंग्लंड२ ते ६ सप्टेंबर     चौथी    इंग्लंड१० ते १४ सप्टेंबर     पाचवी     इंग्लंडमहिलांचा इंग्लंड दौरासामना     दिनांक     स्थळकसोटी     १६ ते १९ जून ब्रिस्टलपहिला वनडे     २७ जून     ब्रिस्टलदुसरा वनडे     ३० जून     टॉन्टनतिसरा वनडे     ३ जुलै     वॉर्सेस्टरपहिला टी-२०     ९ जुलै     नॉर्थम्पटनदुसरा टी-२०     ११ जुलै     होवतिसरा टी-२०     १५ जुलै     चेम्सफोर्ड

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडइंग्लंडबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या