विलगीकरण कालावधी कमी करा; ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या सिनिअर खेळाडूंचे बीसीसीआयला आवाहन

संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर आॅस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंसाठी सहा दिवसाचा विलगीकरण कालावधी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:15 AM2020-09-16T01:15:16+5:302020-09-16T01:15:52+5:30

whatsapp join usJoin us
Reduce the separation period; Australia, England senior players appeal to BCCI | विलगीकरण कालावधी कमी करा; ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या सिनिअर खेळाडूंचे बीसीसीआयला आवाहन

विलगीकरण कालावधी कमी करा; ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या सिनिअर खेळाडूंचे बीसीसीआयला आवाहन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या आॅस्ट्रेलिया व इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा विलगीकरण कालावधी कमी करण्यात यावा, असे आवाहन सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआयला केले आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाल्यानंतर आॅस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंसाठी सहा दिवसाचा विलगीकरण कालावधी आहे. तो कालावधी तीन दिवसाचा असेल तर हे खेळाडू सलामी लढतीसाठी संघासाठी उपलब्ध राहू शकतील. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या एअदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन्ही देशातील २१ खेळाडू चार्टर्ड विमानाने मँचेस्टरहून १७ सप्टेंबरला यूएईत दाखल होतील. सध्याच्या विलगीकरणाच्या नियमानुसार निवडीसाठी ते २३ सप्टेंबरपासून उपलब्ध असतील तर स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. नाव उघड न करण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले की, ‘या खेळाडूंच्या वतीने तशी विनंती करण्यात आलेली आहे.’ (वृत्तसंस्था)

खेळाडूंच्या मते सुरुवातीला आॅस्ट्रेलिया व नंतर ब्रिटनमध्ये बायो बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरण) आहोत. त्यामुळे एका बायोबबलमधून दुसºया बायोबबलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळायला हवी. हे सर्व बायो-बबलच्या बाहेर कुणाच्या संपर्कात आलेले नाहीत. हे खेळाडू साउथम्पटन व मॅन्चेस्टरमध्ये हिल्टन हॉटेलमध्ये थांबले होते. हे हॉटेल स्टेडियमचा एक भाग आहे. त्यांची प्रत्येक पाचव्या दिवशी चाचणी घेण्यात येत होती. ब्रिटनहून ते ज्या दिवशी निघणार आहेत त्या दिवशीही त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. येथे पोहोचल्यानंतर पहिल्या व तिसºया दिवशीही त्यांची चाचणी होणार आहे.

मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाºया एका फलंदाजाने या खेळाडूंच्यावतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विलगीकरणाचा कालावधी तीन दिवसाचा करण्याची विनंती केली आहे. स्पर्धेची तयारी बघण्यासाठी गांगुली बोर्डाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत यूएईमध्ये आहेत. या प्रकरणात त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही,पण सूत्राने सांगितले की अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Web Title: Reduce the separation period; Australia, England senior players appeal to BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.