लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विजय हजारे करंडक राष्ट्रीय वन डे स्पर्धेचा बुधवारी पहिला दिवस विक्रमांचा ठरला. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम केला. वैभव सूर्यवंशी व बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांनी स्फोटक शतके झळकावली.
गनीने अरुणाचल प्रदेशविरूद्ध ३२ चेंडूंत शतक पूर्ण केले. लिस्ट ए मध्ये हे भारताकडून झळकावलेले सर्वांत वेगवान शतक ठरले. वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीराचा मान मिळवला.
कोहलीने मोडला मास्टर विक्रम : विराट कोहलीने दिल्लीकडून शतक करताना लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वांत कमी ३३० डावांत १६ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.
जयपूरमध्ये हिटमॅन तळपला : सात वर्षांनी या स्पर्धेत पुनरागमन केलेल्या रोहित शर्माने सिक्कीमविरूद्ध शानदार दीडशतक झळकावत मुंबईला एकहाती विजयी केले.
इशानची फटकेबाजी व्यर्थ : इशान किशन कर्नाटकविरूद्ध ३३ चेंडूंत शतक झळकावले. हे लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरे वेगवान भारतीय शतक ठरले. मात्र, यानंतरही झारखंडचा पराभव झाला.