Join us

MS Dhoni's second Child?; महेंद्रसिंग धोनीसोबत दिसलं छोटं बाळ; दुसऱ्यांदा बाबा झाल्याची रंगलीय चर्चा, कोणाचं आहे हे बाळ?

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या तयारीला लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:05 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या तयारीला लागला आहे. IPL 2022 साठी येत्या शनिवार-रविवारी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी धोनी आधीच चेन्नईला मुक्कामी गेला आहे आणि CSKच्या संघात कोणकोणते खेळाडू हवेत याची रणनीती त्याने आखली आहे. आयपीएलसाठी त्याने नेट्समध्ये सरावालाही सुरुवात केली. पण, बुधवारी धोनी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) त्यांच्या ट्विटर हँडलवर धोनीचा एका क्युट बाळासोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावरून धोनी पुन्हा बाबा झाल्याची चर्चा सुरू झाली.

साक्षी धोनी प्रेग्नेंट असल्याची चर्चा...चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) IPL 2021जेतेपद पटकावलं होतं. अंतिम सामन्यात CSKनं कोलकाता नाइट रायडर्सवर ( KKR) २७ धावांनी विजय मिळवला होता. CSKचे हे चौथे जेतेपद ठरले आणि या जेतेपदानंतर महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) पत्नी साक्षी ( Sakshi) हिनं मैदानावर धाव घेत पतीला कडकडून मिठी मारली होती. या विजेतेपदासोबतच धोनी कुटुंबियांनी त्यांच्या फॅन्सला आणखी एक गोड बातमी दिली होती. धोनी व साक्षी हे पुन्हा आई-बाबा होणार आहेत आणि सुरेश रैनाची पत्नी प्रियांका हिनं या वृत्ताला दुजोरा दिला होता.  

त्यामुळे CSK च्या ट्विटमध्ये धोनीसोबत दिसणारे बाळ हे त्याचेच आहे का, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक दिसले. पण, हे बाळ नेमके कोणाचे आहे, हे त्यांना कळत नव्हते. धोनीच्या फॅन क्लब सोशल मीडियाने हे बाळ धोनीचा लिटील फॅन असल्याचे सांगितले आहे

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App