लंडन - इंग्लंडचा विक्रमवीर वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दिग्गज फलंदाजांना बाद करण्याचे आव्हान देणे आवडते. पुढील वर्षी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार असून विराट कोहलीविरुद्ध खडतर आव्हानाला सामोरे जाण्यास तो सज्ज आहे.
पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील मालिकेदरम्यान ६०० बळींचा पल्ला गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला अँडरसन व कोहली यांच्यादरम्यान भूतकाळत शानदार लढत अनुभवाला मिळाली.
‘टेस्ट मॅच स्पेशल पोडकास्ट’वर बोलताना अँडरसन म्हणाला,‘त्या दर्जाच्या फलंदाजाला गोलंदाजी करणे नेहमीच कठीण असते. ही मोठी लढत असेल पण मला त्यात आनंद मिळतो. सर्वोत्तम खेळाडूला बाद करण्यास प्रयत्नशील असतो.’ भारताने ज्यावेळी २०१४ मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता आणि अँडरसनने चारवेळा कोहलीला बाद केले होते. भारतीय कर्णधाराला त्यावेळी १० डावांमध्ये केवळ १३४ धावा करता आल्या होत्या, पण २०१८ मध्ये कोहली एकदम वेगळा फलंदाज म्हणून इंग्लंड दौºयावर दाखल झाला. त्याने या दौºयात ५९३ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)
‘२०१४ मध्ये मला त्याच्याविरुद्ध काही प्रमाणात यश मिळाले होते आणि २०१८ मध्ये विराट एकदम वेगळा भासला. त्याने शानदार कामगिरी केली.’
-जेम्स अँडरसन