Join us  

भारत वर्चस्व राखण्यास सज्ज, दक्षिण आफ्रिकेपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान

फॉर्मात असलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:29 AM

Open in App

सेंच्युरियन : फॉर्मात असलेला भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यजमान संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्यास प्रयत्नशील असल्यामुळे टीम इंडियाला गाफिल राहता येणार नाही.भारताने जोहान्सबर्गमध्ये पहिल्या टी-२० सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला होता. कामगिरीत सातत्य राखले तर या दौºयात भारत दुसरी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरेल. कसोटी मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेत ५-१ ने विजय मिळवला, तर आता भारताला टी-२० मालिकेत विजय मिळवत दौºयाचा गोड शेवट करण्याची संधी आहे.भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहली सामन्यापर्यंत फिट होईल. त्याला गेल्या लढतीत अखेरच्या क्षणी दुखापत झाली होती. कोहली फिट नसेल, तर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. गेल्या लढतीत अय्यरच्या स्थानी मनीष पांडेला संधी मिळाली होती. सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी या दौºयात संथ असल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन फिरकीपटूंना संधी दिल्यास कुलदीप यादव खेळू शकतो. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला अद्याप संधी मिळालेली नाही. त्याचाही विचार होऊ शकतो. दुसरीकडे द. आफ्रिका आठ दिवसांमध्ये दुसºयांदा ‘करा अथवा मरा’ अशा स्थितीत सापडले आहेत. त्यात एबी डिव्हिलियर्स टी-२० मालिकेतून बाहेर झाला असून पर्यायी खेळाडूची निवड झालेली नाही.कोहलीची ‘विराट’ कामगिरीविराट कोहलीने कसोटी व एकदिवसीय सामन्यांच्या रॅँकिंगमध्ये एकाचवेळी ९०० गुणांची कमाई केली. अशी कामगिरी करणारा तो द. आफ्रिकेच्या ए. बी. डिव्हिलियर्सनंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.विराटने एकदिवसीय सामन्यांच्या सर्वकालीन यादीत ब्रायन लारालाही मागे टाकले असून तोे सातव्या क्रमांकावर आहे. विव रिचर्ड्स सर्वाधिक ९३५ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत.जसप्रीस बुमराह गोलंदाजी क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. चहल व कुलदीप अनुक्रमे २१व्या आणि ४७व्या स्थानी आहेत.प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एम.एस धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर.दक्षिण आफ्रिका : जेपी ड्युमिनी (कर्णधार), बेहार्डियन, ज्युनियर डाला, रीजा हेन्ड्रिक्स, ख्रिस्टियन जोनेकर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, आरोन फांगिसो, एंडेल फेलुकवायो, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मिट्स.सामना : भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० पासून.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८