कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीला विविध क्षेत्रातील लोकं पुढे आली आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत केली आहे. त्यानं नेमकी किती मदत केली हे जाहीर केले नाही. पण, आता त्याच्यापाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ( RCB) मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी सैन्य व आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. RCB संघाचे मालक DIAGEO अंतर्गत काम करते आणि DIAGEOनं शनिवारी मोठी घोषणा केली आहे.
DIAGEOनं मागील पाच दिवसांत आसाम आणि गोवा येथील फॅक्टरीत सॅनिटायझरची निर्मिती केली आहे ते सॅनिटायझर त्यांनी दान केले. भारतीय सैन्याच्या जालंधर येथील हॉस्पिटलसाठी ते पाठवले आहेत. तेथून ते भारतीय सैन्याच्या विविध हॉस्पिटल्स आणि आयसोलेशन कॅम्पमध्ये पाठवण्यात येतील. त्याशिवाय या कंपनीनं पाच शहरांतील आरोग्य मंत्रालयाला 15 लाख मास्कही पाठवले आहेत. कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला आहे.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी 59 लाखांचे दान केले आहे. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले आहेत. त्यांनी दान केलेल्या रकमेमागे एक गुपित आहे. गावस्कर यांनी टीम इंडियाक़डून 34 कसोट आणि 1 वन डे शतक झळकावलं आहे. म्हणून त्यांनी केंद्राला 35 लाखांची मदत केली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2 शतकं अशी 24 शतकं झळकावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला 24 लाखांची मदत केली.
रोहित शर्मानं 80 लाखांची मदत केली. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
ग्लेन मॅक्सवेल अन् भारतीय मुलीची Untold Love Story; अशी पडली ऑसी खेळाडूची विकेट!
मोठी बातमी : भारताच्या क्रिकेटपटूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
'दादा'ला कडक सॅल्यूट; कोरोनाच्या संकटात Sourav Gangulyचं लाखमोलाचं समाजकार्य!
Corona Virusनं भारताच्या अम्पायरला झाडावर चढवले; नेमके काय घडले?
देशात Lockdown, तरीही Ms Dhoni, R Ashwin च्या अकादमीतर्फे प्रशिक्षण सुरूच