Join us

एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीची द्विशतकी मजल

मुंबई इंडियन्सला मिळाले मोठे लक्ष्य ; देवदत्त पडिक्कल-अ‍ॅरोन फिंच यांचे वेगवान आक्रमक अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:51 IST

Open in App

दुबई : पॉवर प्लेमध्ये केलेल्या फटकेबाजीनंतर अखेरच्या पाच षटकांमध्ये धडाकेबाज एबी डीव्हिलियर्सने दिलेल्या तडाख्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सने द्विशतकी मजल मारली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ३ बाद २०१ धावा केल्या. अ‍ॅरोन फिंच ३५ चेंडूंत ५२ धावा आणि देवदत्त पडिक्कल ४० चेंडूंत ५४ धावा या सलामीवीरांमुळे आरसीबी जबरदस्त सुरुवात केली. मात्र चित्र पालटले ते एबीने.

दुबईत पहिल्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या मुंबईसाठी चांगली सुरुवात झाली नाही पॉवर प्लेच्या सहा षटकांंमध्ये देवदत्त-फिंच यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. यादरम्यान फिंचला दोनवेळा जीवदानही मिळाले. याचा फायदा घेत फिंचने आक्रमक अर्धशतकही झळकावले. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या फिंचचे फॉर्ममध्ये येणे आरसीबीसाठी महत्त्वाचे होते. मात्र त्याचवेळी कर्णधार विराट कोहली पुन्हा फ्लॉप ठरला. तो केवळ ३ धावा करुन राहुल चहरचा बळी ठरला.यानंतर एबीने चौफेर फटकेबाजी करत मुंबईवर कमालीचे दडपण आणले. बुमराहचा अचूक मारा सावधपणे खेळत त्याने इतर गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि २४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. त्याच्या जोडीला अष्टपैलू शिवम दुबे यानेही वाहत्या गंगेत हात धुवून घेताना १० चेंडूंत ३ षटकार व एका चौकारासह नाबाद २७ धावा केल्या. यामुळे आरसीबीला मुंबईविरुद्ध द्विशतकी मजल मारता आली.मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या ५ षटकांत फटकाविलेल्या सर्वाधिक धावा88 आरसीबी मुंबई (2015)82 डेक्कन चार्जर्स मुंबई (2019)78 आरसीबी दुबई (2020)आरसीबीची धावसंख्या1-6 षटके 59-07-13 षटके 37-214-20 षटके 105-1 

टॅग्स :आयपीएलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर