Join us

IPL Auction मध्ये RCB ४०.७५ कोटी खर्च करणार; जाणून घ्या कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 19:27 IST

Open in App

IPL 2024 Retention: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी संघात कायम राखलेल्या व करारमुक्त खेळाडूंच्या नावांची यादी आज सर्व १० फ्रँचायझींनी जाहीर केली. आयपीएल २०२४ची रिटेन लिस्ट जाहीर करण्याची आजची शेवटची तारीख होती. जोफ्रा आर्चर, वनिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, मनीष पांडे, सर्फराज खान, हॅरी ब्रूक, डॅनिएल सॅम्स आदी अनेक स्टार खेळाडूंवर १९ डिसेंबरला आयपीएल लिलावात बोली लागणार आहे. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे  ( RCB) सर्वाधिक ४०.७५ कोटी रक्कम आहे.  

Inside Story! हार्दिक पांड्या अजूनही मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, १६ दिवसांत सूत्र हलणार

RCB कडे ४०.७४ कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे ४०.७५ कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या संघाला आपल्या संघात चांगले खेळाडू निवडण्याची संधी असेल. प्रत्येक संघाला १०० कोटी रुपये देण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५ कोटींची वाढ झाली आहे. अशा स्थितीत, गेल्या वर्षीच्या लिलावात शिल्लक राहिलेली किंमत लिलावात प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात आरसीबी सहाव्या स्थानावर होता. आरसीबी संघाने ७ सामने जिंकले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २००९, २०११ आणि २०११ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु तिन्ही वेळा विजेतेपदाला मुकले होते. 

कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम?

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ४०.७५ कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - ३४ कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - ३२.७ कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - ३१.४ कोटी
  • पंजाब किंग्स - २९.१ कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - २८.९५ कोटी 
  • मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटी
  • राजस्थान रॉयल्स - १४.५ कोटी
  • लखनौ सुपर जायंट्स - १३.९ कोटी
  • गुजरात टायटन्स - १३.८५ कोटी  
टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल लिलाव