आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धची २०० पारची लढाई जिंकत गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयी सलामी दिली आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आलेल्या हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात २०१ धावा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने देवदत्त पडिक्कल आणि किंग कोहलीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर २६ चेंडू आणि ६ विकेट्स राखून दिमाखदार विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिली विकेट स्वस्तात, मग विराट-देवदत्त पडिक्कलची शतकी भागीदारी
२०० पार धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्टच्या रुपात अवघ्या ९ धावांनी RCB नं पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीची जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत १०१ धावांच्या भागीदारीसह सनरायझर्स हैदराबादच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. पडिक्कल २६ चेंडूत ७ चौकार आणि ४ चौकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी करून परतल्यावर कर्णधार रजत पाटीदारची बॅटही तळपली. त्याने १२ चेंडूत ३१ धावांची धमाकेदार खेळी केली. विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील आणखी एक अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कोण आहे Jacob Duffy? ज्यानं पदार्पणाच्या सामन्यात एकाच षटकात अभिषेकसह हेडची केली शिकार
१६ वर्षांनी घरच्या मैदानात जिंकली २०० पारची लढाई
घरच्या मैदानात २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ नेहमीच संघर्ष करताना पाहायला मिळाले होते. याआधी २०१० मध्ये बंगळुरुच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात २०४ धावांचा पाठलाग केला होता. १६ वर्षांनी दुसऱ्यांदा या मैदानात RCB नं २०० पारची लढाई जिंकली आहे.
पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ईशानची बॅट तळपली, पण...
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून ईशान किशन याने कॅप्टन्सीच्या रुपात आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. या सामन्यात रजत पाटीदारनं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेकब डफीनं त्याचा निर्णय सार्थ ठरवत धडाकेबाज फलंदाजी असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला धक्क्यावर धक्के देत पॉवरप्लेमध्येच त्यांची हवा काढली. संघ अडचणीत असताना ईशान किशन याने ८० धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय हेन्री क्लासेन याने २२ चेंडूत केलेल्या ३१ धावांच्या खेळीशिवाय अनिकेत वर्मानं १८ चेंडूत ४३ धावा करत संघाच्या धावफलकावर २०१ धावा लावल्या. आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानावर फक्त एकदाच २०० पारची लढाई जिंकली होती. सुरुवात खराब झाल्यामुळे पुन्हा एकदा ते फसतात की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात देवदत्त पडिक्कलवऱ खेळलेला डाव यशस्वी ठरला. दुसऱ्या बाजूला कोहलीसह कर्णधरानेही तुफान फटकेबाजी केली. परिणामी १६ व्या षटकातच RCB नं सामना खिशात घातला. पदार्पणाच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स घेणारा जेकब डफी हा सामनावीर ठरला.
Web Summary : RCB began IPL 2026 with a win against SRH, chasing down 202. Padikkal's impactful fifty and Kohli's solid innings powered RCB, supported by Patidar's quickfire knock, securing a comfortable victory after 16 years at home.
Web Summary : आरसीबी ने SRH को हराकर IPL 2026 की विजयी शुरुआत की, 202 रनों का पीछा किया। पडिक्कल के अर्धशतक और कोहली की पारी ने आरसीबी को जीत दिलाई, पाटीदार का योगदान भी रहा, 16 साल बाद घर पर जीत।